इंग्रजीमधून आफ्रिकन व अन्य भाषेत आलेल्या बालगीतांची यादी जबरदस्त आहे. अगली डकलिंगची मूळ कथा ‘हान्स ख्रिश्चन अॅन्डरसन’ या डेनिश लेखकाने ११ नोव्हेंबर १८४३ या दिवशी प्रसिध्द केली. पण माडगूळकरानी याच कथेत शंभर वर्षानंतर अक्षरशः प्राणवायू फुंकला आणि आशाताईंनी आपल्या स्वराची पैंजणे बांधली. ते गीत होते, ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’. आफ्रिकेतल्या शिशुगीतांचे पण एक वेगळेच विश्र्व आहे व त्याचा विकास तितकाच मनोरंजक आहे. यात बडबड गीते, खेळातली गाणी आणि धार्मिक-पक्षी-प्राणी-विरंगुळ्याची गाणी. एक आफ्रिकन बालगीत आहे. त्याचे स्वैर भाषांतर होईल, ‘बडा कमजोर है आदमी.. अभी लाखो है इसमे कमी.. पर तू जो खडा.. है दयालू बडा.. तेरे किरपासे धरती थमी.. ए मालिक तेरे बंदे हमे’. आफ्रिकन भाषेतल्या या भक्तीगीताचा अर्थ समजल्यावर कुणाचेही डोळे डबडबून येतील. मग त्याचा कोणत्याही देशाचा पासपोर्ट-व्हिसा असो!
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply