नुकताच दक्षिण आफ्रिकेला जाण्याचा योग आला होता. निसर्गच वरदान लाभलेली भूमी. असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत पसरलेली जंगले, आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती. सर्व बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलेल्या, अश्या माणसांची. हवामान थंड समशीतोष्ण असून देखील तेथील लोकांना सामान्यपणे, वर्ण मिळाला तो काळा. नव्हे खूपच काळा. चेहऱ्यावर एक प्रकारे राकटपणा, तेलकट वा नितळ कातडी. केस जवळ जवळ कुरुळे. भारतीय स्त्रीला लाभलेला नाजूक गहूवर्ण वा गोरारंग त्यांच्या चेहरेपट्टीवर कधीच दिसणार नाही. अर्थात त्यांचे ते स्वरूप त्यांच्या सौंदर्याच्या द्रीष्टीकोनानुसार नजरेमध्ये कदाचित मोहक व सुंदर ह्या संकल्पनेत असेलही.
अशाच एका आफ्रिकन महिलेशी आलेला, न विसरणारा एक प्रसंग:-
आफ्रिकन सफरीच्या मार्गावर एका हस्तकला वस्तूच्या दुकानावर आम्ही थांबलो होतो. मी आणि सौ. तेथील प्रदर्शनामधील अनेक हस्तकलेच्या वस्तू
बघत होतो. सौ.ला एक माळ खूपच आवडली. निरनिराळ्या प्राण्यांची छोटी कोरीव कालाकृती माळेच्या मण्यामध्ये अतिशय सुरेख दिसत होती. त्या दुकानाची प्रमुख एक आफ्रिकन महिला होती. तीने आदरपूर्वक तिच्या अनेक वस्तू आम्हाला दाखविल्या. ती आवडलेली माळ तीने दहा डॉलरला देऊ केली. सौ. तिच्या पाकीटमधून पैसे काढीत असता, सौ.च्या हातातील काचेच्या बांगड्यावर त्या महिलेची नजर गेली. तिच्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य दिसले. काचेच्या बांगड्या तिच्या पाहण्यात नव्हत्या. “ हे काय आहे ? व हे तुम्ही का घालता.? “ तिच्या चौकस प्रश्नात आश्चर्य वा कौतुक पण दिसून आले. विशेष करुन जेंव्हा बांगड्या ह्या भारतीय महिलासाठी सौन्दर्य व सौभाग्याचे लक्षण असते हे समजल्यावर. अचानक तिने इच्छा प्रदर्शीत् केली. ” तुम्ही बांगड्याचा एक जोड मला देऊ शकता? “ आम्हाला तिच्या उत्छुकतेची गम्मत वाटाली. सौ.ने क्षणाचाही विलब न लावता, हातातल्या दोन काचेच्या बांगड्या तिला प्रेमाने दिल्या. तिनेही त्याचा स्वीकार ” थंक्स” म्हणत केला, तिने आम्ही निवडलेली हस्तकलेची माळ बांधुन दिली. ती म्हणाली ” तुमच्या बांगड्याबद्दल आभारी. कृपा करुन ही मजकडून मित्रत्वाची सप्रेम भेट स्वीकारा. ” आम्ही देखील हासत तिच्या प्रेमळ भेट वस्तुचा ( Return gift चा ) स्वीकार केला. प्रेमाच्या संस्कृतीचेही एक समीकरण असते. त्याच्या अनुशंगाने जे उत्पन्न होते, जो परिणाम होत असतो, तो निश्चितच सर्वत्र तसाच असतो. जगातील कोणत्याही देशात जा. कारण प्रेम आहे निसर्गाचा एक आविष्कार.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply