आफ्रिकन सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत प्रथम विजयश्री प्राप्त केली १९५४ साली. त्यावर्षी इजिप्तच्या अॅंटीगॉनने सुंदरी पद पटकावले. १९५८ ला सादर झालेल्या स्पर्धेत पेनीलोप नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने चषक पटकावला. १९७४ साली स्पर्धेत नाट्य घडले. हेलन मॉर्गन या ब्रिटीश सुंदरीला मुकुट मिळाला. चार दिवसांनंतर समजले, तिला अठरा महिन्याचा मुलगा होता. ‘आई’ असल्याचे समजल्यावर तिला राजीनामा द्यावा लागला. मग विजेतेपद गेले द. आफ्रिकेच्या सुंदरीकडे. २०१२ साली विजेतेपद गेले नायजेरियाच्या एकोणीस वर्षाच्या सुंदरीकडे.
आफ्रिकन स्पर्धेची सुरूवात होते दररोजच्या सुंदर पेहरावात. कारण खूप नट्टापट्टा केल्यावर स्त्रीचे नैसर्गिक सौंदर्य नष्ट होते. म्हणजे जातीच्या सुंदरांना काहीही शोभते हे आफ्रिकन देशांच्या केव्हाच लक्षात आले आहे.
भविष्यात या स्पर्धा अटीतटीच्या होणार. कारण स्पर्धकांची संख्या आत्ताच शंभराच्यावर जाऊन पोहोचली व वाढत आहे. स्पर्धक संख्या वाढली की विवादाला प्रारंभ होतो. २००२ साली स्पर्धेची वेळ जवळ आल्यावर स्पर्धकांनीच बहिष्कार टाकला होता. कारण ‘अमिना लावेल’ या नायजेरियन स्त्रीला लग्नबंधाबाहेर संबंध ठेवले म्हणून अचानक दगडाने ठेचून ठार मारण्याचे फर्मान निघाले होते. तसा अमिनाचा स्पर्धेशी काहीही संबंध नव्हता. पण हा वाद ऐन स्पर्धेच्या कालावधीत उफाळून आला. केवळ निषेधाच्या हेतूने विश्वसुंदरी स्पर्धक संतापले. अखेर स्पर्धा लंडनला पार पडली. ती तुर्कस्थान सुंदरीने जिंकली. स्पर्धा प्रथमपासून विवाद्य मुद्यांना तोंड देत आली आहे.
स्पर्धेला १९५१ साली सुरूवात साली. त्यावेळी नाव होते, “कंचुकी स्पर्धा”. मात्र हे शिर्षक सपशेल वाह्यात वाटल्यामुळे प्रसिध्दी माध्यमांनी तिचे नामकरण केले “विश्वसुंदरी स्पर्धा”. आफ्रिकन सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत प्रथम विजयश्री प्राप्त केली १९५४ साली. त्यावर्षी लंडनला आयोजिलेल्या १६ स्पर्धकात इजिप्तच्या अॅटीगॉन या सुंदरीने मान पटकावला. नंतर चार वर्षानी लंडनमध्ये सादर झालेल्या २२ जणींच्या स्पर्धेत पेनीलोप नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने विश्वसुंदरीचा चषक पटकावला.
१९५९ साली बीबीसीने स्पर्धेचे प्रक्षेपण करायला प्रारंभ केला. त्यापूर्वी मुख्यतः रेडिओ या त्यावेळच्या लोकप्रिय माध्यमाचा स्पर्धा प्रसिध्दीत सहभाग असे. १९५९ सालापासून बीबीसीने स्पर्धा टीव्हीवर प्रसारीत करण्यास सुरूवात केली व १९६० ते १९७० कालावधीत उदंड प्रतिसाद मिळवला. स्पर्धा लवकरच विवादाच्या फेऱ्यात आली.
१९७४ साली लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये ५८ जणींच्या स्पर्धेत नाट्य घडले, स्पर्धेच्या वेळी नव्हे-स्पर्धेनंतर. प्रथम हेलन मॉर्गन या ब्रिटीश सुंदरीला मुकुट मिळाल्याचे जाहीर झाले. पण चार दिवसांनंतर ती बाद झाल्याचे जाहीर झाले कारण तिला अठरा महिन्याचा मुलगा होता. स्पर्धेच्या नियमानुसार ती अविवाहीत असायला पाहिजे. पण ती “आई” असल्याचे समजल्यावर तिला विश्वसुंदरीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मग विजेतेपद गेले द. आफ्रिकेच्या अॅनेलीन नावाच्या एकोणीस वर्षाच्या सुंदरीकडे. २०१२ साली लंडनच्या स्पर्धेत ९३ जणींचा सहभाग होता. विजेतेपद गेले नायजेरियाच्या एकोणीस वर्षाच्या सुंदरीकडे.
१९७० साली विरोध दर्शविण्यासाठी निदर्शकांनी गचाळ दर्पाचे बाँब स्पर्धा सभागृहात फेकले. त्यावेळी सुप्रसिध्द हॉलीवूड अभिनेते बॉब होप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. १९७४ सालची विश्वसुंदरी चांगलीच गोत्यात आली कारण ती “कुमारी माता” असल्याचे नंतर कळले व तिचे पद हिसकावून घेण्यात आले. तर १९७६ साली दक्षिण आफ्रिकन सुंदरीला गचांडी मिळाली कारण तो देश वर्णभेद करण्यात कुप्रसिध्द ठरला होता. १९८० साली आयोजकांनी स्पर्धेचा हेतू स्पष्ट करण्यासाठी नवे उपशीर्षक जाहीर केले, “सद्कारणासाठी सौंदर्याचा सदुपयोग’. मात्र १९८० च्या दशकात विरोधकांनी टीव्ही प्रक्षेपण अन्य वाहिनीवर नेण्यास भाग पाडले. १९८० साली एका विश्वसुंदरीने नग्न छायाचित्रे प्रसिध्द केल्याचे लक्षात आल्यावर तिचे पद गेले. १९८८ साली ‘आम्हाला भानगड नको’ म्हणून बीबीसीने प्रसारणाला स्पष्ट नकार दिला. १९९६ साली बंगलोरच्या सादरीकरणात विरोधकांनी धुमाकूळ घालून सुंदरींचे तरणवेषातील छायाचित्रण सेशेल्स देशाला हलविण्यास भाग पाडले. १९९८ साली विश्वसुंदरीवर स्पर्धेअगोदर नुकताच बलात्कार झाल्याचे समजले. १९९७ साली १५५ देशातले २५० कोटी लोक हा कार्यक्रम पाहत होते. आता हा आकडा तीनशे कोटीच्या कितीतरी वर गेला असणार.
प्राचीन काळापासून भारतीय नारी तिच्या सौंदर्याबद्दल जगप्रसिध्द आहेत. आता तर त्यांच्याकडे सौंदर्य व बुध्दीमत्तेचा सुंदर मिलाफ असल्याचे जगाला माहीत झाले आहे. भारतीय सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत आपला खास ठसा उठवला आहे. त्यांनी केलेली कामगिरी अभिमानस्पद आहे.
दरवर्षी स्पर्धेची वेळ जवळ आली की भारतीयांची विश्वसुंदरी टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी उत्कंठा आता शिगेस पोहोचते. त्यांच्या अंतःकरणात फक्त एक अभिमान गीत झंकारत असते, ‘‘ये दुनिया एक दुलहन दुलहन माथेकी बिंदिया-ये मेरा इंडिया, आय लव्ह यू इंडिया !’’
रीटानंतर भारतीय सुंदरीनी एकापाठोपाठ स्पर्धेचा रंगमंच विश्वसुंदरीपद जिंकून झळाळून टाकला.
डावीकडूनः ऐश्वर्या राय बच्चन (१९९४), डायना हेडन (१९९७) युक्ता मुखी (१९९७) आणि प्रियांका चोप्रा (२०००).
या स्पर्धेला सुमारे पासष्ट वर्षापूवी प्रारंभ झाला तेव्हापासून काहीतरी घटनेने ती वादाच्या फेऱ्यात सापडली. मात्र क्वचितच सुंदरीचा त्यात दोष होता. त्यामुळे स्पर्धेवर “बाई तेथे भानगड” असा सरसकट शिक्का मारणे ठीक होणार नाही.
१९७० : विश्वसुंदरी स्पर्धा सोहळा लंडनच्या जगप्रसिध्द रॉयल अल्बर्ट सभागृहात चालू होता. हॉलिवूडचे सुप्रसिध्द कलावंत बॉब होप सूत्रसंचालन करत होते. मात्र काही महिला निदर्शकांनी स्पर्धेवरचा आपला रोष व्यक्त करण्यासाठी धान्याच्या पीठाचे बाँब टाकले.
१९७३ : उपान्त्य फेरीत सात जणींची रीतसर निवड झाली. त्यातून विश्वसुंदरीची निवड पण झाली. मात्र एका सुंदरीने रंगमंचावर गचाळ वर्तन केले. निवड समितीने तिच्याबददल नापसंतीचे उद्गार काढले. मात्र तिचे सुंदरीपद रद्द केले नाही.
१९७४ : ब्रिटनच्या हेलेन मॉर्गनला विश्वसुंदरीपद मिळाले. मात्र चारच दिवसांनी ती “कुमारिका आई” असल्याचे समजले व तिला सन्मान गमवावा लागला.
१९७६ : बऱ्याच देशांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला. कारण होते, वर्णद्वेशी दक्षिण आफ्रिकेच्या प्रवेशाबद्दल अन्य देशांचा निषेध. मात्र १९७७ साली द. आफ्रिकेने भाग घेतला. त्यानंतर त्या देशांनी १९९१ सालापर्यंत स्पर्धेत भाग घेतला नाही.
१९८० : जर्मनीच्या गॅब्रियलने विश्वसुंदरीपद जिंकले. पण नंतर थोड्या दिवसात तिने पदाचा तडकाफडकी राजीनामा सादर केला. त्याचे प्रथम कारण दिले, माझ्या मित्राला हे पसंत नाही. पण “अंदरकी बात” नंतर समजली ती म्हणजे तिने एका नियतकालिकाला छायाचित्रासाठी नग्न पोझ दिली होती.
१९९६ : भारतात बंगलोरला स्पर्धा झाली. काही विरोधकांनी सुंदरीच्या जलतरण वेषाला नासंमती दर्शविली. मग हे चित्रण सेशेल्स या देशात हलविले. नंतर मात्र सोहळा निर्विघनपणे पार पडला.
१९९८ : इस्रायलच्या लिनरला विश्वसुंदरीपद मिळाले. पण थोड्याच दिवसात तिने उघड केले, स्पर्धेच्या दोन महिने अगोदर तिच्यावर बलात्कार झाला होता. त्यात आरोपीला शिक्षापण झाली. पण या बातमीमुळे स्पर्धेच्या ख्यातीला मात्र गालबोट लागले.
२००२ : स्पर्धा रमझानच्या दिवशी नायजेरियात आयोजित केली होती. त्यावर काही देश संतापले. त्यावर कुणीतरी म्हटले. मुहम्मद आज जिवंत असता तर त्याने स्पर्धेतल्या एका उमेदवाराशी विवाह केला असता. यावर प्रकरण आणखी चिघळले. काही देशांनी आपल्या उमेदवारांना परत बोलावले. मग स्पर्धा लंडनला झाली. तुकर्स्थानच्या सुंदरीने विश्वसुंदरीपद पटकावले.
२००९ : स्पर्धेअगोदर लायबेरिया सुंदरीच्या निवडीमध्ये सरकारने ढवळाढवळ केली असा वाद माजला. शेवटी स्पर्धा पार पडली आणि दक्षिण आफ्रिकेकडे विश्वसुंदरीपद गेले.
“हम काले है तो क्या हुआ….”
आफ्रिकन विश्वसुंदरीः आफ्रिकन सुंदरींबद्दल नेहमीच कौतुक असते. त्यांच्या कृष्णवर्णामुळे नव्हे तर त्या गोऱ्या देशातल्या सुंदरीवर कशा मात करतात याचे नेहमी कुतूहल ठरते. पाच आफ्रिकन विश्वसुंदरीची श्रेयनामावली अशी होती.
१९५४ : स्पर्धेचे शहर लंडन, स्पर्धेची तारीख १८ ऑक्टोबर,
अॅंटीगॉन कोस्टानडाला अरेबिक भाषेखेरीज इंग्रजी, इटालियन आणि फ्रेंच भाषा सफाईने बोलता येत होत्या. तिला स्पर्धेत ७.९४१ गुण मिळाले. पण पुढल्याच वर्षीच्या लंडनला झालेल्या स्पर्धेला ती हजर राहिली नाही. कारण इजिप्त आणि ब्रिटनचे राजनैतिक संबंध सुएझ कालव्याच्या विवादामुळे पार बिघडले होते.
विश्वसुंदरीपद मिळाल्यावर ती आखाती देशात व फ्रान्स आणि इटली मध्ये सर्वोत्तम मॉडेल म्हणून नावारूपाला आली. २००६ सालच्या इजिप्त सुंदरी स्पर्धेसाठी तिला परीक्षक नेमले.
१९५८ : स्पर्धेचे शहर लंडन-ब्रिटन, स्पर्धेची तारीख १३ ऑक्टोबर,
पेनीलोप कूलन : डर्बनला राहणारी ती एका कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करायची. स्पर्धेनंतर ती देशवासीयात कमालीची लोकप्रिय झाली कारण तिचे सौंदर्य व रूबाबदार चालीवर लोक भाळून गेले. नंतर तिने हॉलिवूड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र तिथे ती पहिल्याच चाचणीत अयशस्वी झाली. मग ती वस्त्रोद्योग क्षेत्रात उतरली व अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीत भाग घेतला.
पुढे ती नाताळ प्रांतातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याशी विवाहबध्द झाली. ती आता एका अतिथीगृहाची मालकीण आहे. तिला आहेत पाच मुले व तीन नातवंडे.
१९७४ : स्पर्धेचे शहर लंडन, स्पर्धेची तारीख २८ जुलै.
अॅनेलीन कीनः या सालची स्पर्धा विवादात सापडली. हेलेन मॉर्गन या ब्रिटीश विश्वसुंदरीची पदासाठी निवड झाल्यानंतर कळले ती कुमारीका आई आहे. मग पद दक्षिण आफ्रिकेच्या अॅनेलीनकडे गेले. तिचे वडील तुरूंगाधिकारी होते. पण दोन वर्षानंतर तिलाही एका विवादाला तोंड द्यावे लागले. तिचे सन्डे टाइम्सच्या मुखपृष्ठावर नग्न छायाचित्र प्रसिध्द झाले. १९८० साली तिचा एका कसीनोच्या मालकाशी विवाह झाला. मात्र नंतरच्या पाच वर्षात घटस्फोट झाला. मग तिने स्वित्झर्लंडला जाऊन यहुदी धर्माची दीक्षा घेतली. तिला दोन मुली झाल्या. १९९४ साली तिने परत घटस्फोट घेतला.
२००१ : स्पर्धेचे शहर सन सीटी, स्पर्धेची तारीख १६ नोव्हेंबर,
अगबानी डेरीगो ही संगणक विज्ञान शाखेची विद्यार्थीनी. तिला तात्काळ एक लाख डॉलरचे पारितोषिक मिळाले. याखेरीज दीड लक्ष डॉलरच्या भेटवस्तू मिळाल्या. ‘काळ्या रंगात किती सौंदर्य दडलेलं असतं’ अशा उद्गारानी तिच्यावर प्रशंसेचा वर्षाव झाला.
ती आठ भावंडातली एक. तिच्या आईला कर्करोग झाला होता. म्हणून तिला शिक्षणासाठी वसतीगृहात ठेवले. नंतर दोन वर्षांनी तिच्या आईचा अंत झाला. तिच्या मृत्यूनंतर तिला जबाबदारीने वागावे लागले. अगबानी म्हणते, ‘यामुळे मला मनोघैर्याची वेगळी शिकवण मिळाली’. वडील सनातनी होते तरीपण तिची मॉडेल बनण्याची महत्त्वाकांक्षा होती. विद्यापीठीय शिक्षणात तिने संगणक व गणिताचा विशेष अभ्यास केला होता.
विश्वसुंदरीपद जिंकण्याअगोदर तिने इंग्लंड, स्कॉटलंड, नायजेरिया या देशातल्या स्पर्धेत पण सुंदरीपद मिळविले होते. पुढे ती न्यूयॉकर्ला गेली व तिने मानसशास्त्राचा विशेष अभ्यास केला.
२०१४ : स्पर्धचे शहर लंडन, स्पर्धेची तारीख १४ डिसेंबर,
रोलीन स्ट्रासः विश्वसुंदरी स्पर्धेच्यावेळी रोलीन वैद्यकीय अभ्यासकमाचा चौथ्या वर्षाचा अभ्यास करत होती. त्या संध्याकाळी रोलीनने १२१ स्पर्धकांना मागे टाकून मुकुट प्राप्त केला. ती आघाडीची मॉडेल तर होतीच. शिवाय ती बौद्धिक प्रतिभा स्पर्धेत सर्वांच्या पुढे होती. त्याखेरीज तिने ऑक्सफर्ड विद्यार्थी युनियनच्या वक्तृत्व स्पर्धेतही प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिचे वडील डॉक्टर व आई नर्स होती. ती वडिलांच्याबरोबर इस्पितळात जायची तेव्हा सगळे तिला चिडवायचे, ‘या आल्या आमच्या कुरळ्या केसाच्या चिमुकल्या डॉक्टरीणबाई !’ मुकट हातात घेतल्यावर रोलीनने भावपूर्ण शब्दात मनोगत व्यक्त केले, ‘हा मुकूट मी माझ्या मायभूमीला अर्पण करते’. आणखी एक गुपित तिने उघडे केल्यावर त्या संध्याकाळी लंडनच्या सभागृहात बसलेल्या कितीतरी जणांना भडभडून आले. ती म्हणाली, ‘आई बाबांनी प्राप्त केलेले मी परीक्षा नळीतले अपत्य आहे’.
१९५० पासून स्पर्धा सुरू झाली. दरवर्षी विश्वसुंदरी स्पर्धेच्या रंगमंचकावर उलगडणारे दृश्य एखाद्या गल्लीतल्या किंवा चौकातल्या युवतींच्या मेळाव्याचे नसते. या पृथ्वीतलावरचे खुद्द सत्यं, शिवं, सुंदरमचे ‘सौंदर्य’ रूप तेथे साकार होत असते.
Leave a Reply