अगाध लीला अनामिकाची
अतर्क्य अगम्य ब्रह्मांड सारे
सुख दुःखांची उन , सावली
जीवनी प्रारब्धाचे भोग सारे….
शिशुशैशवी जीणे निरागस
प्रगल्भ मनी , हव्यास सारे
स्वार्थी मनीषा , सारेच माझे
मृगजळा पाठी धावती सारे….
भावभावनांचे शुष्क कंगोरे
इथे प्रीतभाव सुकलेले सारे
मनामनात मौन साशंकतेचे
संपले विश्वासाचे नाते सारे….
कधीकधी वाटते सुर जुळले
क्षणार्धात हरवूनी जाते सारे
जरी वाटले , निश्चिंती जगावे
तरी कर्म भोगावे लागते सारे….
संसाराची , कसरत विलक्षण
मोहपाशी मन गुंतन जाते सारे
काय मिळविले , काय हरविले
विचारात , जगणेच सरते सारे….
*********
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २७७
२९/१०/२०२२
Leave a Reply