अहंभाव हा रागाचा जनक आहे. ती एक भावना आहे जी समाजामध्ये नकारात्मक दृष्टीकोन आणि अराजकता माजवत असते. ज्यावेळेस व्यक्ति स्वत:ला इतरांपेक्षा वरचढ समजू लागते, त्यावेळेस त्या व्यक्तीमध्ये हा अहंभाव निर्माण होवू लागतो. अहंभावामुळे वैयक्तिक सुधारणा किंवा कुधारणा होतात आणि त्याचा परिणाम समाजावर होवू लागतो. अहंभाव किंवा अहंकारामुळे स्वत:ची भावना अशी होवू लागते की माझ्याशिवाय काही होणेच शक्य नाही, जे काही होते ते माझ्यामुळेच होते. ज्यावेळेस एखादी व्यक्ति
दुस-यास दुख: देवू लागते, त्यावेळेस ती अहंकारी होत असते. अशाप्रकारे दुस-यास दुख: दिले असता, आपणांसही दुस-याकडून एक सर्वसाधारण प्रतिक्रिया म्हणून वाईट वागणूक मिळत असते. त्याचाच परिणाम म्हणून संरक्षण – स्व: संरक्षण, हल्ला – प्रतिहल्ला केला जावून समाजामध्ये, देशांमध्ये आणि जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर अराजकता, असमंजसपणा आणि गोंधळ माजविण्यात होत असतो. म्हणूनच समाजामध्ये शांती आणि सद् भावना राखण्यासाठी असा हा हानिकारक अहंभाव समाजातून तसेच स्वत:मधून नाहीसा झाला पाहिजे.
अहंकाराची कारणे :
१)आपल्या कुटुंबामध्ये एखाद्या मुलाला विशेष स्थान देण्याची धडपड. २) समाजामध्ये असणा-या इतर जातींपेक्षा, समाजापेक्षा किंवा धर्मापेक्षा स्वत:ला फारच उच्च समजणे. ३) उच्चपद आणि विशेष सवलती मिळाल्यास अहंभाव निर्माण होणे. ४) समत्वाची भावना किंवा मानवतेचा अभाव असणे. ५) खेळकर वृत्तीचा अभाव असणे आणि अडेलतट्टूपणाचे धोरण अवलंबिणे. ६) मानपान मिळविण्याची आस बाळगणे.
अहंकाराचे परिणाम :
१)अहंभावामुळे राग आणि तणाव निर्माण होवून त्यापासून शारीरिक आणि मानसिक आजार होणे. २) एकमेकांमध्ये भांडणे, द्वेष आणि हिंसाचार निर्माण होणे. ३) आपले स्वत:चे विचार
दुस-यांवर लादल्यामुळे सामंजस्याला तिलांजली दिली जाणे. ४) गुलामगिरी, शिवाशिव,
दुस-याला कमी लेखणे, स्वत: उच्च्पदस्थ आहे असे समजणे, दुस-यांवर कुरघोडी करणे, त्यांना नाडणे, त्यांच्यावर अन्याय करणे. ५) जातीभेद, रंगभेद, लिंगभेद, इत्यादी प्रकारांमुळे ताण-तणाव वाढणे, अनागोंदी वाढणे व हुकुमशाही पद्धतीने वागणे इत्यादी प्रकार दिसून येतात.
समाजातून नकारात्मकता काढून थाक्ण्यासाठीचे उपाय :
१)साधी-सोपी जीवन पध्दती व आहार सवयी अनुसरणे. २) साधे परंतू स्वच्छ असे कपडे अंगावर घालणे. ३) स्वत:मध्ये अहंभाव येवू देवू नका. ४) दुस-यांना कमी लेखू नका किंवा त्यांचा दुस्वास करू नका. ५) स्वत:चे वागणे सुधारा. ६) दुस-याला त्याच्या जातीवरून, रंगावरून, किंवा लिंगावरुन कमी लेखू नका. ७) स्वत:मध्ये मित्रत्वाची भावना जागविणे. ८) वंदनासन, शशकासन आणि पश्चिमोत्तानासाने करा. ९) दुस-यांना दुख: होईल असे शब्दप्रयोग किंवा वाक्यरचना करण्याची टाळा. त्याऐवजी आपले बोलणे आणि भाषा हि मृदू व नम्र ठेवा. १०) शांतता ठेवा. ध्यानधारणा करा आणि वेळोवेळी शवासनाचा अभ्यास करा. ११) आपले विचार नेहमी प्रगल्भ ठेवा आणि परमात्म्याविषयी विचार करा. १२) दुस-या व्यक्ति ज्या आपल्यापेक्षा जास्त सक्षम आणि कार्यक्षम आहेत, त्यांचाबद्दल विचार करा.
आपण आजूबाजूच्या वातावरणामुळे व परिस्थितीमुळे, तसेच शहाणपणाचा अभाव असल्यामुळे किंवा अज्ञानामुळे अहंकारी बनतो. याचा दुस-यांवर वाईट किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला ते कमी प्रतीचे किंवा हीन दर्जाचे लेखतात. जार आपण दुस-यांचा आदर करावयास लागलो, तर आपण हे लक्षात घ्या की ते सुध्दा तुम्च्याकडे आदरानेच पाहतील. तुमचा आदर करावयास लागतील व तुम्हाला आदराने वागवतील व त्यामुळे आपासातील भांड किंवा वाद निर्माण होणार नाहीत, ते मिटण्यास मदतच होईल.
………मयुर तोंडवळकर
Leave a Reply