खरं तर अहंकार, अहंकार नसतोच मुळी !
तो असतो “मी”……
आणि मी जर ‘मी’ सारखं जगणार नसेल किंवा जगता येत नसेल तर का जगायचं ?
मी ‘मी’ ला मारून नाही जगू शकत !
सहजच म्हंटल जातं. “आमक्या कडे इतकं असून सुद्धा त्याला अजिबात Ego नाही”(पैसा, बुद्धी, सौदर्य, कला किंवा काहीही) म्हणजे इतरांपेक्षा कुणा कडे काही जास्त असेल तरच त्याला Ego ची मुभा असते का ?
किंवा असंही म्हंटल जातं, “सालं, याच्या काहीच नाही तर याला इतका attitude आहे.” म्हणजे सर्वसामान्य माणसाला Ego नसावा का ?
खरं तर Ego/ अहंकार/ Attitude असणं म्हणजे आत्मसन्मान असणं ! तो प्रत्येकाला असतोच !
पण जगाला शहाणपण शिकवायला अहंकाराचा वापर करायचा, त्या पोस्ट वर विरोधात कॉमेंट टाकली तरी यांचा Ego hurt झालाच समजा…….
आता जिव्हाळ्याचा विषय – प्रेम !
प्रेमात कधी कधी ठीक आहे “मी”ला मागे खेचण……! अर्थात, ते सुद्धा कधी कधीच हं ! कारण नेहमी नेहमी तसं केलं तर, समोरच्याच्या ‘मी’ सुखावला जातो ! बरं तो नुसता सुखावला तरी हरकत नसते पण तो वरचढ होऊन वाकुल्या दाखवतो तर कधी मस्तवाल होऊन खीजवतो आपल्या “मी” ला आणि आपल्यातला “मी” हतबल होऊन पहात बसतो समोरच्याच्या ‘मी’ कडे !
मग त्या वेळी येते ती आत्मग्लानि !!!
तुम्ही जर खरंच प्रेम करत असाल एकमेकांवर तर अहंकार जपा एकमेकांचा, नव्हे प्रेम करा एकमेकांच्या अहंकारावर !
तळटिप :- मी माझ्यातल्या “मी” जितकं प्रेम करतो ना, तितकंच तीच्यतल्या ‘मी’ वर सुद्धा करतो…….
कारण,”ती” मला कधीच लीन, दीन, हतबल, अगतिक, असहाय्य, मजबूर, गरीब, हवालदिल झालेली आवडणार नाही !!
….आणि चालणार सुद्धा नाही, कारण शेवटी काहीही झाल तरी ती “”माझी”” आहे नं !
— विनोद डावरे, परभणी.
9765 998 999
खरं आहे ,स्वतः बरोबर समोरच्या व्यक्तीचा आत्मसन्मान देखील तितकाच महत्वाचा असतो आणि तो प्रत्येकाने जपला पाहिजे .
-अश्विनी पर्वते.
https://maitrinmanatali.com