नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग २

जेवण शाकाहारीच आहे, पण त्यातही किती विविध छटा दिसतात ना ? सात्विक राजसिक तामसिक इ.इ.

आपण घेत असलेल्या आहारांचा गुणाशी काहीही संबंध असतच नाही, ही ऋषीमुनींनी केलेली थापेबाजी आहे, असे काही जणांना वाटते. पण वास्तवात असे नाही.

बाजारात हाॅटेलमधे मिळणारे अन्नपदार्थ आणि घरात तयार होणारे अन्न यात फरक नाही ? घरात आईने केलेले पदार्थ आणि हाटेलातील बाईनं केलेले पदार्थ, यातील कॅलरीज कदाचित सारख्याच असतील, पण भावनांचा विचार केला तर निश्चित फरक पडतो.

हाटेलमधे केलेल्या जेवणात घरच्या सारखी स्वच्छता, पवित्रता, विवेक आणि मांगल्य कुठुन येणार ? हाटेलच्या जेवणाने कदाचित पोट भरेल पण मन भरणार नाही. कारण त्यात भाव असत नाही. प्रेम असत नाही. असतो फक्त पैसा. बिझनेस ! जो वैश्यवृत्तीच्या इंग्रजाकडून आपण शिकलोय.

तामसिक आहार घेणाऱ्याची वृत्ती केवळ चवीने जेवण करणे आणि पोट भरणे !
राजसिक आहाराने मन आणि बुद्धी चंचल होते. राजसिक प्रवृत्तीची माणसे अत्यधिक महत्वाकांक्षी असतात!
आणि सात्विक भोजन संतुलीत असते. कारण असं जेवण केल्याने मादकताही निर्माण होत नाही, ना आळस, ना अशक्तपणा ना उत्तेजना. केवळ स्फूर्ती येते आणि ताकद मिळते.

समजा आपण एखाद्याच्या घरी पाहुणे म्हणून जेवायला गेलेला आहात. पंचपक्वान्नाचे संतुलीत, चौरस जेवण तयार आहे. परंतु जेवण वाढणाऱ्यांनी उपरोधाने आपणाला म्हटले,
“काय हो ऽऽऽ, यापूर्वी असे जेवण तुमच्या उभ्या आयुष्यात कधी खाल्ले होते काय ?”
तर तुम्हाला ते चांदीच्या ताटात वाढलेले जेवण आवडेल काय ?

इथे भाव महत्वाचा आहे. कॅलरीज नाहीत.
दुसऱ्याच्या घरातील जाऊदेत, आपल्याच घरात आपली आई किंवा सौभाग्यवती वा बहिणाबाई भाकरी करीत आहे. साध्या चटणीबरोबर ती गरम गरम भाकरी इतकी छान लागते. सहज तोंडातून शब्द बाहेर येतात,
” व्वाह, क्या बात है, ”
एका भाकरीने भूक भागतच नाही. दुसरी भाकरी घेता, तिसरी मागता.. तसा आईचा चेहेरा खुलत जातो. वाटलं तर परत पीठ भिजवेन, पण जरा दमानं खा, असं प्रेमानं म्हणते. तेव्हा तिच्या डोळ्यातील भाव बघण्यासारखे असतात.

आता सीन बदला.

आपल्याच घरात स्वयंपाकाला आलेली बाई भाकऱ्या करीत आहे. त्याच चटणीबरोबर तुम्ही भाकरी खाताय. तुम्हाला भाकरी आवडली आहे. तुम्ही आणखी एक भाकरी तिच्याकडे मागताय. आता तिचा चेहेरा नीट बघा. कपाळावर आठ्या, डोळे वटारलेले, ‘मेल्याला आजच भाकऱ्या खायची लहर आलीय, जरा कुठे घरी लवकर जाणार होते, तो बसला गिळायला’ जणु असे भाव तिच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसताहेत………
तुम्हाला ते समजताहेत….
असलेली भूक क्षणार्धात गायब होऊन जाते. आणि भरल्या ताटावरून ऊठावेसे वाटते ना ?

असे का झाले ? तर भाव बदलले.
भाव बदलले, तर चिडचिड वाढतेच ना !

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..