नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ३

आपल्याला चुकुन खूप राग आला तर आपण सहजपणे काय म्हणतो ?
“कच्चा चबा के खा जाऊंगा”
याचा दुसरा अर्थ असा होतो की, आपल्या भावना बदलल्या की राग येतो. जेव्हा राग येतो तेव्हा भावना तीव्र असतातच, पण त्या आणखीन तीव्र होण्यासाठी कच्चं खाण्याची भाषा केली जाते.
याचा अर्थ असा आहे, की कच्चे अन्न खाऊ नये. भावना बदलतात.

कच्चे अन्न आपणा मनुष्याना हितकर नाही. माणसाला देवाने बुद्धी दिली आहे. अन्न शिजवण्यासाठी अग्नी दिला आहे. विज्ञानाने अग्नी संरक्षित करण्यासाठी साधने दिली आहेत. भारतात जन्माला येऊन सुसंस्कार शिकवले आहेत. आणि या सर्वांचा वापर केला गेला नाही तर समर्थांच्या भाषेत “करंटा” ही पदवी प्राप्त होते.
(हाती आहे पण वापरायचे नाही, आणि नंतर रडत बसायचे. म्हणजे हातात लाॅटरीचे तिकीट आहे. सर्वात मोठे बक्षिस लागलेले आहे, पण अंतिम तारखेपर्यंत तिकीट दाखवून बक्षिस न आणणे याला करंटेपणा म्हणतात.)

शाकाहारी प्राण्यांना देखील त्यांचा शाक आहार पचवण्यासाठी तो पोटातून परत मागे तोंडात आणून रवंथ करावे लागते, तरच तो आहार त्यांना पचतो. त्यासाठी त्या शाकाहारी प्राण्यांच्या पोटात ईश्वराने वेगळा कप्पा ठेवलेला असतो, पण माणसाला रवंथ करण्याची सोय नाही.

भाज्या कधीही कच्च्या खाऊ नयेत.
शाक म्हणजे भाजी. पालेभाजी, फळभाजी, कंदभाजी, वेलीची भाजी, शेंगभाजी, असे प्रकार सांगता येतील.

आजकाल पाश्चात्य बुद्धीचे डाएटिशियन असे सांगतात, कच्च्या भाज्या खा. सॅलेडस खा, मोड आलेली कडधान्ये कच्चीच खावा.

पालेभाज्या या वातुळ आहेत. तुरट चवीच्या आहेत. कच्च्या खाल्ल्यातर पचतच नाहीत, किंवा त्या पचवण्यासाठी आपली पचनशक्ती किंवा ऊर्जा संपून जाते.

आठवड्यातून एखादा दिवस, प्रमाणात थोडी, सुसंस्कारीत, पचायला जड असणारे भाजीतील काही घटक भाजीतून निवडून, आधीच काढून टाकलेली, नीट शिजवलेली, मसाल्यांचा युक्तीने वापर करून पचायला सुलभ बनवलेली, भाजी पचवायला शरीराला कष्ट पडत नाहीत, पण रोज रोज, असा कच्चा पाला पोट किती सहन करणार ना ?
कच्चं खायची एक मर्यादा सांगून ठेवतो, ताटात कच्ची कोशींबीर, पचडी घ्यावी. पण किती ? जास्तीत जास्त दोन चमचे. चार चमचे. यापेक्षा अधिक नको.

पोट तरी कायकाय करणार? आणि किती करावं ना पोटाने तरी ?
पण, अन्न पचवण्याचा………
जो वादा किया है ऽऽऽ, निभाना पडेगा ।
या तत्वाने पोट आपल्या परीने हा सगळा पाला पचवण्यासाठी, रोके जमाना चाहे, आपले सारे कसब पणाला लावते.

पण सरतेशेवटी आतली उर्जा संपल्याने पचन बिघडते, आणि हमखास वात वाढतो.

लिमिट की भी कुछ हद होती है यार !!

वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..