नवीन लेखन...

आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ११

प्राण्यांचे मांस मिळवणे आणि खाणे एवढीच ही इंडस्ट्री नाही. तर याही पुढे जात पुढील मनीमेकींग सुरू झाले. भारतीय संदर्भ, भारतीय जीवनपद्धती, भारतीय संस्कार, भारतीय ग्रामीण मानसिकता यांच्यावर आघात करणारे आक्रमण घाऊक मांस उत्पादकांनी सुरू केले. निव्वळ मांसाच्या किंवा अंड्यांच्या विक्रीतून आवश्यक तो फायदा होत नाही हे लक्षात आल्यावर बायप्राॅडक्टस कसे तयार करता येतील, याची विक्री योजना तयार झाली.

पशुहत्येतून मिळणारे रक्त वायाच जात होते. त्यापासून रक्त वाढणारी टाॅनिक तयार केली जाऊ लागली. नव्हे ती गरज बनली. आज बाजारात अनेक कट्टर शाकाहारी रूग्णांना, अनेक कट्टर शाकाहारी डाॅक्टर ही रक्तवाढीची टाॅनिक लिहून देत आहेत. दोघांनाही माहीत नाही आपण काय करतोय !

जनावरांची चरबी वायाच जाते. तिच्यापासून अनेक नामवंत साबण बनवले जात आहेत आणि आम्ही मारे अंगाची खोलवर स्वच्छता, तंदुरुस्ती की रक्षा करने के लिए, निंबुयुक्त, अश्या विशेषणांना भुलुन, असले कचरा साबण बिनधास्त वापरत आहोत.
( वेळीच लक्षात आल्यामुळे गेली वीस वर्षे मी स्वतः कोणत्याही कंपनीचा कोणताही साबण आंघोळीला वापरत नाही. एकदम हॅप्पी. उटणे वापरतो. वर्षभर दिवाळी ! प्रत्येक दिवस हा आनंददायी वाटत असेल तर निशीदिन आम्हा दसरा दिवाळी. )

या चरबीपासूनच मेणबत्या, काही सौंदर्य प्रसाधने, तयार केली जातात. मध्यंतरी महाराष्ट्रामधेच या चरबीपासून वनस्पती तूप तयार करणाऱ्या एका छुप्या कारखान्याचा पर्दापाश केला गेला होता.
गेल्या दशकातील अॅनिमल टेलो आयात प्रकरण हातोहात दडपले गेले आणि परदेशातील चरबी निर्यातदार सुरक्षित राहीले हा इतिहास आहे.

पण आपण सोयीस्कर पणे विसरून जातो. आणि अगदी सत्यनारायणपूजेसाठी सुद्धा असले वनस्पती तूप/ डालडा वापरलेला प्रसाद खातो. ( प्रबोधन केल्यामुळे आमच्या गावातील हित जाणणाऱ्या काही पुरोहितानी, सत्यनारायणाच्या पुजेतील साहीत्यामधे प्रसादाकरीता, गावठी गाईचे तूप नसल्यास पूजा केली जाणार नाही, असा पवित्रा घेतला. आणि गावात आरोग्यदायी प्रसाद मिळू लागला. ठरवलं तर आपण काहीही बदल घडवू शकतो, याचं हे छोटसं उदाहरण )

हत्येनंतर शिल्लक राहिलेल्या हाडकांपासून कॅल्शियम फाॅस्फरस वेगळे काढून, किंवा काहीवेळा हाडकांच्या राखेचा वापर फोलगेट सारख्या नामवंत टूथपेस्ट बनवताना बेस म्हणून केला जाऊ लागला. आणि दातांची स्वच्छता करण्यासाठी ही हाडांची राख उपवासाच्या दिवशीसुद्धा तोंडात रगडू लागलो.

यातून तयार केलेले जिलेटीन हे आणखीनच एक द्रव्य. आज सर्रासपणे चाॅकलेट, टाॅफीज, आईस्क्रीम बनवण्यासाठी वापरले जाते.

पशुंच्या लिव्हर किंवा अन्य अवयवांपासून मिळवलेली, बनवलेली काही एन्झाइम्स आज मेडीकल मार्केट मधे धडल्ले से बेची जा रही है !

पण लक्षात घेतो कोण ?
चलता है यार असं स्टाईलवर म्हणून या पापात सहभागी होत जातो. एका बाजूने पापपुण्य असलं काही नसतंच. असं ठामपणे पटवून देणारी बुद्धिमान माणसं तयार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला सगळी मेंढरं. कुणीही हाका…….. कुठेही जायला तयार !

किती ठिकाणी, कोणत्या रस्त्यावरून, कुठे जात, कसलं सीमोल्लंघन करायचंय, हे ठरवण्याचा आजचा दिवस.

याचा फक्त एक तासभर विचार करायचा. आणि पुनः पुढील वर्षी दसऱ्याच्या शुभेच्छा म्हणेपर्यंत विसरून जायचं. झालं…. !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
11.10.2016

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..