मांसाहार करण्याची संयुक्तिक कारणे आणि समर्थन कितीही केले तरी ते लंगडेच होईल. कितीही शोधून काढा, माणसासाठी दररोज मांसाहार करणे हा कदापि आरोग्यदायी होणार नाही.
आपली गाडी जर पेट्रोलवर चालणारी असेल, तर ती गाडी डिझेल किंवा राॅकेलवर चालेल का ?
चालेलही.
पण किती दिवस ? आणि चालवली तरीही आतमधे काहीतरी, कुठेतरी दोष उत्पन्न होणारच ना !
अगदी हाच नियम वापरून बघा, जर माणसाचे शरीर निसर्गाने शाकाहाराला पूरक केले असेल तर त्यातील केवळ इंधन बदलले तर गाडीचे अॅव्हरेज वाढेल का ?
कधीही नाही.
शाकाहारी प्राण्यांची रचना आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळीच आहेत. ती मान्य करणे यातच जास्त शहाणपणा आहे.
काही व्यक्ती रोज मांसाहार करतात. काही आठवड्यातून ठराविक दिवस. तर काही जण महिन्यातून ठराविक दिवस.
पण ही मंडळी फक्त मांसाहारच करतात का ? नाही.
मांसाहाराबरोबर शाकाहार तर घेतच असतात. नव्हे तो घ्यावाच लागतो.
मांसाहारी कुटुंबात जन्म झाल्यामुळे मांसाहारी सवय लागतेच. पण त्यामुळे काय खातोय, कसं खातोय, कशासाठी खातोय, परिणाम काय होणार आहेत, यावर चिंतन अजिबात होत नाही. करू शकत नाही. जशा परंपरा चालत आलेल्या आहेत तशाच त्या पुढे सुरू रहातात. यालाच अंधानुकरण म्हणतात. संस्कार एवढे पक्के होतात, की मांसाहाराचे दुष्परीणाम समजूनही मांसाहार सोडता येत नाही. जणु काही त्याचे व्यसनच लागते. मग घरातले पुरत नाही, रवि बुध लवकर येत नाही तेव्हा बाहेरील हाॅटेलिंग सुरू होते. खाल्लेले मांस सहजपणे पचत नाही म्हणून त्यासाठी पुनः मद्य सेवनाचा दोष.
एका दोषातून बाहेर पडण्यासाठी पुनः दुसरा दोष निर्माण केल्यासारखंच नाही का ?
म्हणजे एका उष्ण औषधाचे ऊष्ण परिणाम (म्हणजे अॅसिडीटी) दुष्परिणाम कमी करण्यासाठी दुसरे थंड औषध ( म्हणजे अॅण्टासिड .) याचा तिसरा दुष्परिणाम मलविबंध (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन ) यावरील औषधांनी आतड्यांचा फ्लोरा डिस्टर्ब होतो, म्हणून आणखी एक औषध. त्याने काही व्हिटामिन्स कमी होतात, म्हणून आणखी एक औषध. म्हणजे एक गुन्हा लपवण्यासाठी आणखी एक गुन्हा !
मग काय,
जगण्यासाठी चौदा पंधरा प्रकारची औषधे सुरू होतात.
आजन्म !
मरे पर्यंत !!
Until death !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
8.10.2016
Leave a Reply