जिथे जे उपलब्ध आहे, तिथे ते स्वस्त मिळते. ज्यांच्यावर मालकी हक्क आहे, ते विकत घ्यावे लागत नाही.
प्राण्यांना मारण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जाते, त्याला खर्च जास्ती येतो. मांसपशुपक्षी तयार करण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी, मांस टिकवून ठेवण्यासाठी वेगळी रचना करावी लागते, जी खूप महाग होते, निसर्गाच्या विरोधात होते.
भाज्या धान्य उत्पादन करण्यासाठी जी शक्ती वापरावी लागते ती निसर्गाच्या विरोधात नसते, उलट हे निसर्ग पूरक काम असते. अन्नधान्य फळं मिळवण्यासाठी लावलेली झाडे वगैरे आपल्याला प्राणवायुच पुरवतात. कार्बन शोषून घेतात. वातावरणाचे रक्षण करीत असतात. निसर्गाला पूरक कार्य चाललेले असते.
मालकाच्या विरोधात जाऊन केलेले काम आणि मालकाचा फायदा होईल असे केलेले काम. यात मालकाला कोणते काम अधिक आवडेल ?
पोट भरण्यासाठी शाकाहार हा स्वस्त आणि मस्त होतो. आज हाॅटेलमधे मिळणाऱ्या कोणत्याही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या डिश पहा. जगात कुठेही जाऊन शोधा, मांसाहारी डिश महाग आहेत.
असे का ?
त्यांचे निर्माणमूल्य जास्ती आहे म्हणून !
ज्या वस्तू कोणाचे नुकसान न करता तयार होतात, त्या स्वस्त बनतात.
एक परिक्षण असे सांगते की, एक किलो मांस तयार करण्यासाठी किमान सत्तर किलो चारा वा खाद्य पशुंना खावे लागते. हे खाद्य ज्या जमिनीवर तयार केले जाते, त्याच जमिनीवर जर धान्य उत्पादन केले गेले तर दरदिवशी किमान सत्तर जणांचे एका वेळेस पुरेल एवढे भोजन तयार होऊ शकते.
मांसाहार करायचा असेल तर पूर्णपणे परावलंबी रहावे लागते. निसर्गदत्त मांस देणारे प्राणी कमी होत आले आणि खायला दुसरे अन्न निसर्ग देत नाही, अशा विपरीत स्थितीमधे माणसाला कृत्रिमपणे प्राण्यांची पैदास करावी लागली. निसर्गाच्या विरोधात जाऊन, निसर्गावरच त्यांच्या पोषणाचा अनावश्यक भार टाकून, कृत्रिमपणे तयार केलेल्या प्राण्यांचे मांस माणसाचे पोषण कसे बरे करील ? आज जे मांस उत्पादन कारखाने दिसत आहेत ती केवळ पैसा मिळवण्याचे साधन झाले आहे. पण यातून कधीही शांती मिळत नाही. म्हणून ही शांती अनुभवण्यासाठी भारतामधे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे.
मांसाहार करणाऱ्या प्रदेशात शांती कुठुन मिळणार ? आडातच नाही तर पोहोऱ्यात तरी कुठुन येणार ?
त्यांची सुरू असते फक्त धडपड,
जगण्यासाठी.
सतत अस्वस्थपणे….
केवळ स्वतः जगण्यासाठी !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
9.10.2016
Leave a Reply