आहाररहस्य-आहारसार भाग 7
गहू कोकणी माणसांनी, कोकणात तर खाऊ नयेच. पण जिथे पिकतो तिथे सुद्धा तो खावा की नाही, अशी परिस्थिती आहे.
या संदर्भात काही गोष्टींची माहिती जरूर असावी.
1.भारतात सर्वात जास्ती गव्हाचे उत्पादन पंजाब, हरयाणा मधे होते.
2. भारतात सर्वात जास्ती रासायनिक खते आणि विषारी कीटकनाशके पंजाब मधे वापरली जातात.
3. भारतात सर्वात जास्त कॅन्सर चे रूग्ण पंजाब मधे आढळतात.
4. या कॅन्सर ग्रस्त रूग्णांच्या सोयीसाठी रेल्वेने एक स्पेशल ट्रेन चालवली आहे. ही कॅन्सर स्पेशल ट्रेन आठवड्यातून दोनदा पंजाब ते राजस्थान अशी धावते. जिथे राजस्थान मधील सर्वात मोठे कॅन्सर रूग्णालय आहे.
5.कॅन्सर होण्यामागे रासायनिक खते, विषारी औषध फवारणी, विषारी प्रतिजैविके आणि अनावश्यक औषधे कारणीभूत आहेत.
6. आपल्या बाजारपेठेत आलेला गहू हा अश्याच रासायनिक खतांवर वाढवलेला असतो. हे कदापि विसरून चालणार नाही.
ही सर्व माहिती सत्य मानली तर…
केवळ फवारणी करणार्या शेतकऱ्याला जर कॅन्सर होतोय तर हे धान्य खाणार्यांना तो होईल की नाही, हे नीट विचार करून पहावे.
ही समस्या फक्त भारतातीलच आहे असे समजू नये. पूर्ण जगात या रासायनिक शेतीचे कॅन्सर रूपी राक्षसी परिणाम दिसताहेत.
या रासायनिक खत आणि विषारी औषधे निर्माण करणार्या भांडवलदार कारखानदारांची लाॅबी एवढी मजबूत आहे, की कोणत्याही देशातील सरकार उलथवून टाकण्याची यांची ताकद आहे.
असो.
आपण गहू खाताना काय काळजी घ्यावी.
1 असा गहू खायचाच असल्यास चार वेळा विचार करावा.
2.कारण ही रसायने केवळ गहू धुवुन जात नाहीत. बाहेरून धुतल्याने (कदाचित) विषारी किटकनाशके जातीलही, पण मुळातून आत गेलेली रासायनिक खते कशी धुतली जातील ?
3. आपल्याकडे गहू चार वेळा धुवुन, कडक उन्हामधे चार वेळा वाळवून, साठवून, नंतर दोन वर्ष जुना करून वापरणाऱ्या कुटुंबांचे प्रमाण केवळ 10 % असेल.
अश्या प्रकारे न धुता वापरलेला गहू हा भविष्यातील गंभीर आजारांची नांदी आहे.
4. केवळ गहूच नव्हे तर ज्वारी बाजरी मका ही धान्ये देखील न धुताच वापरली जात आहेत.
5 रेडीमेड तैय्यार आटा ( धुणे सोडाच पण ) कदाचित न निवडतासुद्धा कीड कचरा कोंडा यांच्यासकट तयार केला जात असेल. त्याचा विचारपण करू नये. यांच्या स्वच्छतेवर विश्वास ठेवणार असाल तर माझी काहीच हरकत नाही.
6 कोकणात नाचणी तांदळाची सेंद्रीय पद्धतीने शेती तरी होते, पण घाटावर गहू ज्वारी बाजरीची नैसर्गिक शेती ऐकीवात नाही. जर होत असेल तर माहिती करून द्यावी.
7. इथे माणसांना बसायला जागा नाही, तिथे वाळवणं कुठे घालत बसणार ? असो. त्यातून ज्यांना गहू खायचाच असेल तर निदान धुवून भाजून तरी ठेवा.
ही माहिती असत्य असेल तर शतायुषी भव !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
Leave a Reply