‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ लिहिणारे शायर अहमद फराज. ऊर्दू शायर अहमद फराज यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे झाला. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा यावरचे तरल संवेदनशील शेर ही त्यांच्या शायरीची खासियत. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
त्याच्या शायरीवर फैज व अहमद नदीम कासमीच्या भावुक व संवेदनशील शैलीचा प्रभाव होता. सामाजिक संदर्भ त्यांच्या गज़लेपेक्षा कवितेत प्रकर्षांने साकारतात. ग़जलेत प्रणयाचा रंगछटा तरल शब्दशैलीत उमलतात. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
अहमद फराज यांचे वडील सय्यद मोहम्मदशाह परख पेशावर विद्यापीठात प्राध्यापक होते. फराजच्या काव्यलेखनाचा आरंभ असा झाला. ते दहावीत शिकत असताना त्यांनी पहिला शेर रचला अन् तो वडिलांच्या उशाशी ठेवला.
जब कि सब के वास्ते लाये है कपडे सेल से
लाये है मेरे लिए कैदी के कंबल जेल से
१९५१ मध्ये फराज पेशावरहून कराचीला आले. एक वर्ष कराची रेडिओवर कार्यक्रम करीत होते. ती नोकरी सुटली. अन् पेशावरला परतले. अन् १९५४ साली बी. ए. करतानाच त्यांचा ‘तनहा- तनहा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी फारसीमध्ये एम.ए. केलं. अन् ते पेशावर रेडिओवर निर्माते झाले. अन् वडील सेवानिवृत्त होताच पेशावर विद्यापीठात लेक्चरर झाले. पाकिस्तान नॅशनल सेंटर इस्लामबादचे डायरेक्टरही झाले. १९८२ ला त्यांना हद्दपार करण्यात आलं तेव्हा ते लंडनला राहिले. सरकार बदलल्यावर ते पाकिस्तानात परतले. त्यांनी पाच-सहा नाटकंही लिहिली. जानाँ’, ‘बे-आवाज गली-कूचों में’ ‘नाबीना शहर में आईना’, ‘असासा’.
अहमद फराजच्या शायरी संग्रहाची नावे अशी, ‘दर्द-आशोब’,‘तनहा-तनहा’, ‘शब खून’, ‘नायाफ्त’, ‘जानाँ. ज्येष्ठ उर्दू समीक्षक शमीम हनफीच्या मते फराजच्या भाषेवर व कथनशैलीवर फारसी व क्लासिकल उर्दू गजलचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा इत्यादीचे शेर फराजच्या गज़लांचे वैशिष्टय़ होते.
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोडम्के जाने के लिए आ
अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले
‘दर्द-आशोब’ या फराजच्या पहिल्या संग्रहातील गज़ला मेहदी हसनने गाऊन जगभर पोहचवून लोकप्रिय केल्या. मेहदी हसन मात्र गज़ला गाताना शायराचे नाव अवश्य नमूद करत असत.
अहमद फराज यांचे २५ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :-लोकसत्ता/ डॉ. राम पंडित
Leave a Reply