(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद )
अहो सुरांच्या गुरुराया, द्या मला तुम्ही दीक्षा ।।
बनुन सुरांचा दीन भिकारी,
गुरुराया, आलो मी दारीं
सरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान
स्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत तुम्ही ज्ञान
त्या ज्ञानाची घाला माझ्या झोळीमधिं भिक्षा ।।
द्या मला तुम्ही दीक्षा ।।
पसरवीन मी तुमचे सूर
जगीं अशान्ती करीन दूर
सूरज्ञान देउन, संगें मज घेउनिया, स्वामी,
असेल कोलाहलच निरंकुश, तिथें चला तुम्ही
तेथें नेउन घ्या माझ्या ज्ञानाची पुरी परीक्षा ।।
द्या मला तुम्ही दीक्षा ।।
– – –
( पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या गद्य भाषांतरावर आधारित )
–
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply