नमस्कार वाचकहो,
आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये….
या घटनेला चार वर्षे झाली आहेत. काय रहस्य आहे राजच्या गायब होण्यामागे? तो खरंच निघून गेलाय? की राजचा खून झालाय? की कोणी त्याचे अपहरण केलंय? राजने आत्महत्या केलीय की आणखी काही? ….
राजचं नेमकं काय झालंय हे शोधण्यासाठी तुम्हीही येताय ना माझ्याबरोबर?…. चला तर मग..…..
‘अजब न्याय नियतीचा’ या माझ्या क्रमशः प्रसिध्द होणाऱ्या रहस्यमयी प्रेमकथेसोबत ……
— संध्या प्रकाश बापट
Leave a Reply