नवीन लेखन...

अजब न्याय नियतीचा – भाग ११

ठरल्याप्रमाणे तिघंही नीलच्या गाडीतून फिरायला जाण्यासाठी बाहेर पडले.

दी म्हणाली, “आपण आधी गावातून एक फेरफटका मारू…..नील, मी तुला गांवातील काही महत्त्वाची ठिकाणं दाखवते, मग आपण टेकडीवरच्या देवळात जाऊ.”

नील ड्रायविंग करत होता. दी नीलला माहिती सांगण्यासाठी म्हणून त्याच्या शेजारी, पुढील सीटवर बसली. आरू मागच्या सीटवर बसली. गावातून फेरफटका मारायला बराच वेळ लागेल याचा अंदाज आरूला आलाच होता. गांवातील इतर स्थळं परत बघण्यात आरूला अजिबातच इंटरेस्ट नव्हता. काल रात्रीच्या प्रकाराने तिची झोप अर्धवट झाली होती. ती शांतपणे मागच्या सीटवर डोके टेकून, डोळे मिटून विश्रांती घेण्याचा प्रयत्न करत होती. रात्री नीलने तिला ‘कोकरा’ची उपमा दिली होती ते आठवून तिला हळूच हसू आले. त्याबरोबर तीचे मन, तीन दिवसांपूर्वी म्हणजे, १० तारखेला, तिच्या वाढदिवसादिवशी नीलने दिलेल्या ‘Pleasant Surprise Party’ च्या आठवणीत रमून गेले.

*****
१० तारखेला दिवसभराच्या गडबडीत आरू तिचा वाढदिवस आहे हे विसरूनच गेली होती. गम्मत म्हणजे दीने, नीलने किंवा तिच्या मित्र-मैत्रिणींपैकी कुणीही तिला दिवसभरात वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रत्यक्ष किंवा मेसेज करून दिल्या नव्हत्या. संध्याकाळी नील एका Surprise Party साठी दोघींना घेऊन बाहेर पडला.

नीलने गाडी एका Five Star Hotel च्या दारात थांबवली. नीलने अत्यंत आदबीने आरुला गाडीतून उतरण्यासाठी हात दिला, तिला नम्रपणे कमरेत वाकून आतमध्ये येण्याची विनंती केली. नीलच्या या वागण्याची आरुला मोठी मौज वाटत होती.

नीलने आधीच बुक करून ठेवलेल्या एका छोट्या हॉल मध्ये त्यांनी प्रवेश केला. हॉल मध्ये एकदम मंद प्रकाश होता आणि सुरेल संगीत वाजत होते. आरूने हॉलमध्ये प्रवेश करताच एकदम संगीत वाजायचे थांबले आणि हॉलमधील सगळे दिवे चालू झाले. आरूच्या पायाखाली गुलाबाच्या फुलांच्या पायघड्या घातलेल्या होत्या. एकदम तिचे लक्ष आतमध्ये गेले, तिथे एका टेबलावर मोठ्ठा केक ठेवलेला दिसत होता. संपूर्ण हॉल कलात्मक पद्धतीने सजवलेला होता. ठिकठिकाणी रंगीत फुगे आणि फुलांचे गुच्छ होते. अचानक एक फुगा फुटल्याचा आवाज आला आणि आरूच्या अंगावर रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्या, झिरमिळ्या, चॉकलेट्स, थर्माकोलचे छोटे रंगीत मणी आणि चकचकीत कागदांचे तुकडे यांचा वर्षाव होऊ लागला.

आरू आणि दी आवक होऊन सारं पहात होत्या. तेवढ्यात, इतकावेळ केक ठेवलेल्या टेबलामागे लपून बसलेली ‘सप्तसूर’ ची टीम बाहेर आली आणि एका सुरात गावून सगळ्यांनी आरूला ‘Happy Birthday To You, Dear आरू’ म्हणत संगीतमय शुभेच्छा गायला सुरुवात केली. आरूने केक कापला आणि पार्टीला सुरुवात झाली. मंद संगीताच्या तालावर सगळे जोडी जोडीने नृत्य करीत होते. आज नील बरोबर नृत्य करताना आरुला मनापासून आनंद होत होता. सगळीजणं पार्टी खूप enjoy करत होते.

आरू, खरंतर आज तिचा वाढदिवस आहे हे पूर्णपणे विसरून गेली असल्यामुळे, हे तिच्यासाठी खरोखरच एक ‘Pleasant Surprise’ होतं.

आरूला नीलनं हॉलमध्ये केलेली सजावट पाहून आणि नीलनं आवर्जून तिच्या सगळ्या टीमला वाढदिवस साजरा करायला बोलवलं हे पाहून खूप खूप आनंद झाला. मग काय, ती संध्याकाळ आरुसाठी आणि तिच्या मित्रमंडळींसाठी एक ‘यादगार शाम’ बनून गेली. कधी नव्हे ते दीसुद्धा संपूर्ण पार्टीमध्ये आनंदाने सहभागी झाली होती.

रात्री उशिरा डिनर झाल्यावर, पार्टी संपल्यावर नील दोघींना त्यांच्या घरी पोहोचवून निघून गेला.

घरात गेल्यावर दीने आरूला मायेने जवळ घेतले आणि म्हणाली, “आरू, Sorry बेटा, आज पहिल्यांदा असं झालं की तुझा वाढदिवस माझ्या लक्षात राहिला नाही. पण Thanks to नील, त्यानं खरंच खूप धुमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा केला.”

“असूदे ग दी, आज माझ्या तरी कुठं लक्षात राहिलं होतं वाढदिवसाचं? पण त्यामुळं ही पार्टी ‘Surprise Party’ झाली. तुला आवडली ना?”

“हो तर, नीलनं खूपच छान arrange केली होती पार्टी. खूप मजा आली.”

“बरं दी, आपल्या गांवी जाण्यासाठीची maximum तयारी मी केली आहे. किरकोळ गोष्टी राहिल्यात, त्या मी उद्या आणेनंच. तुझ्यासाठी काही आणायचं बाकी असलं तर मला उद्या सांग, म्हणजे पॅकिंग करता येईल. परवा सकाळी आपण निघू. Good Night दी.”

“Good Night आरू, तूही आज खूप दमलीस. झोप आता शांतपणे” असं म्हणून दी तिच्या झोपायला खोलीत निघून गेली.

आरूने पार्टीची साडी बदलली आणि झोपायला पलंगावर गेली. आजच्या पार्टीच्या आठवणीने तिला खूप छान फील होत होते. पार्टीत ती सगळ्यांच्या गराड्यात असल्यामुळे तिला नीलशी फारसे बोलता आले नव्हते.

आरूने मोबाइल वरून नीलला मेसेज केला, “Love You Lot. Thanks For The Wonderful and Memorable Celebration.”

अंथरुणावर पडल्या पडल्या वाढदिवसाच्या पार्टीतल्या गोड आठवणी काढत आरू झोपी गेली होती.

आत्ता गाडीत बसल्या बसल्या आरूच्या मिटलेल्या डोळ्यांमध्ये वाढदिवसाच्या पार्टीच्या आठवणी रुंजी घालत होत्या. तेवढ्यात गाडीला ब्रेक मारल्याच्या आवाजाने आरू भानावर आली. त्यांची गाडी डॉक्टर जोशींच्या हॉस्पिटल समोर थांबली होती.

आरूने विचारले, “दी आपण हॉस्पिटल मध्ये कशासाठी आलो आहोत?”

“अगं, डॉ. जोशी आपल्या बाबांचे लहानपणीचे वर्गमित्र आहेत. मी बाबांबरोबर कायम त्यांना भेटायला येत असे. आपण गावात आलो आणि त्यांना न भेटता गेलो, हे त्यांना कळले तर त्यांना खूप वाईट वाटेल. मी तुमच्या दोघांची त्यांच्याशी ओळख करून देते. मग आपण जाऊ पुढे.”

आरू म्हणाली, “अगं दी, पण असं अचानक आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि ते कामात असतील तर?”
“Don’t Worry, मी सकाळीच निघायच्या आधी त्यांना फोन केला होता.”

“ठीक आहे. चल जाऊया आत.”

डॉ. प्रशांत जोशी न्यूरो सर्जन होते. त्यांचे धाकटे बंधू डॉ. प्रकाश जोशी हे मानसोपचार तज्ज्ञ होते. त्यांच्या बरोबरच इतर विविध आजारांवर उपचार करणारे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्सही काम करत होते. ‘जोशी हॉस्पिटल’ हे संपूर्ण पंचक्रोशीतील नावाजलेले हॉस्पिटल होते.

दीने दवाखान्यात प्रवेश करतांच रिसेप्शनिस्टने तिचे हसून स्वागत केले. “या मॅडम, डॉ. जोशी आपलीच वाट पहात आहेत.”

सगळेजण डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले. डॉ. प्रशांत जोशी, ५०-५५ वयाचे, उमदे व्यक्तिमत्व होते. त्यांनी हसून तिघांचे स्वागत केले. दीने डॉक्टरांशी आरू आणि नीलची ओळख करून दिली.

आरुला पाहून डॉ. म्हणाले, “बरं झालं आरू बेटा, आज तुझ्याशीपण ओळख झाली. तशी लहान असताना एक दोन वेळा आली होतीस तु, पण मोठी झाल्यावर मी आज प्रथमच पाहतोय तुला. तुझी ताई बरोबर नसती तर मी तुलाच चारुलता समजलो असतो, इतक्या सारख्या दिसता तुम्ही. असो, तुलाही भेटून मला आनंद झाला. By the way, Mr. Neel तुम्ही आधी कधी मला भेटलाय का?”

“नील हसून म्हणाला, “अहो, या गावात मी आज पहिल्यांदाच आलोय.”

“हो का? पण तुम्हाला आंत येताना, चालताना पाहून, आणि तुम्ही बोलत असताना, तुमचा आवाज ऐकून, मला तुमच्याशी आधीपासून ओळख असल्यासारखं वाटलं. चेहेरा ओळखीचा वाटला नाही पण बोलण्या-चालण्याची आणि हसण्याची लकब ओळखीची असल्यासारखं वाटलं मला. असो. बरं चारू तुमचा किती दिवस मुक्काम आहे इथे?”

“अजून दोन दिवस आहोत आम्ही.”

“बरं का आरू, तुझे बाबा माझे बालपणीचे मित्र होते. माझे वडील याच गावात वैद्य होते. ते अत्यल्प किमतीत रुग्णांना सेवा म्हणून आयुर्वेदिक औषधें देत असत. त्यांचा हातगुणही चांगला होता. त्यांची इच्छा होती की, मी आणि प्रकाशने शहरात जाऊन मेडिकलचे शिक्षण घेऊन गावातच मोठा दवाखाना काढावा. ज्यामुळे आजूबाजूचा गांवातील लोकांना मोठ्या उपचारांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागू नये. पण एकावेळी दोघांच्या शिक्षणाचा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यावेळी तुझ्या आजोबांनी आमच्या दोघांच्या शिक्षणाची आणि शहरात होणाऱ्या राहण्या खाण्याच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि आम्ही दोघेही डॉक्टर झालो.

तो पर्यंत तुझ्या बाबांचे इंजिनीरिंगचे शिक्षण पण पूर्ण झाले. त्यांनी शहरात राहून व्यवसाय करायचा निर्णय घेतला. आम्ही गांवी येऊन दवाखाना काढायचे आधीच ठरवले होते. पण जागेचा आणि हॉस्पिटल उभारणीसाठी भांडवालाचा प्रश्न होता. तुझ्या आजोबांनी आधी गावांत मध्यावर्ती ठिकाणी असलेले त्यांचे एक दुमजली सहा खोल्यांचे घर आम्हाला दवाखाना चालवण्यासाठी फुकट उपलब्ध करून दिले. जसा जसा आमचा जम बसु लागला, रुग्णांची गर्दी वाढायला लागली तसं तुमच्या आजोबांनी ही आत्ताची हॉस्पिटलची जागा आहे ना, ती जागा १०१ रु. वार्षिक भाडे असा ५० वर्षाच्या लीज वर आम्हाला देवून टाकली, आणि तुझ्या बाबांनी अत्यल्प किमतीत या संपूर्ण हॉस्पिटलचे बांधकाम करून दिले. म्हणजे तसं पाहिलं तर हे हॉस्पिटल तुमचंच आहे आणि या हॉस्पिटलच्या मालकीमध्ये 40% share तुमच्या नावावर आहे.”

दी म्हणाली, “डॉक्टर काका, असं म्हणून तुम्ही आम्हाला लाजवू नका. बाबांनी कधीच मला या गोष्टी सांगितल्या नाहीत. म्हणजे या गोष्टींचा मोठेपणा मिरवायला त्यांनाही आवडले नसते. ते नेहमी मला तुमच्या लाहानपणीच्या गमती जमती आणि तुमचं मित्रप्रेम या बद्दलच खूप गोष्टी सांगत असत. त्यांनी जे काही केलं ते तुमच्या वरच्या प्रेमापोटीच केलं. आई बाबा अपघातात गेले तेव्हा तुम्ही आम्हाला किती मदत केली होती हे मीही विसरले नाहीये.”

“असं कसं, त्यांचं असं अचानक जाणं हे आमच्यासाठीही धक्कादायक आणि अतिशय दुःख दायक होतं. आशा

वेळीआम्ही तुमच्या पाठीशी राहायलाच पाहिजे होतं, आणि भविष्यातही आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत.”
“ते जाऊदे ना डॉक्टर काका, नील आणि आरू, तुम्ही बसा इथे थोडावेळ, मी काही डॉक्युमेंट्स चेक करून त्यावर सह्या करून लगेच येते. चला काका.”

असं म्हणून दी डॉक्टर काकांबरोबर आतील केबीन मध्ये निघून गेली. १०-१५ मिनिटात ती परत आली. डॉक्टर काकांना bye म्हणून ते देवळाच्या दिशेने जायला निघाले.

(क्रमशः)

— © संध्या प्रकाश बापट 

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..