नवीन लेखन...

दिग्गज कसोटीपटू, यशस्वी कर्णधार अजित वाडेकर

आपल्या मुलाने गणितात शिक्षण घेऊन, इंजिनिअर व्हावे, अशी अजित वाडेकरांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांचा जन्म १ एप्रिल १९४१ रोजी झाला. मात्र अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपले करिअर निवडले व यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका अजित वाडेकर समरसून जगले. अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब.

रणजी स्पर्धा आठ वर्षे गाजवल्यानंतर १९६८ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी अजित वाडेकर यांच्यासाठी कसोटी क्रिकेटचे दरवाजे उघडले. पुढे आठ वर्षांत ते ३७ सामने खेळले व त्यांनी केवळ एक शतक ठोकले पण नऊ वेळा ते नव्वदीत बाद झाले. मा.अजित वाडेकर हे कायम तिसऱ्या क्रमांकावर खेळायला येत व भारताच्या डावाला स्थैर्य मिळवून देत. स्लीपमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशी वाडेकर यांची ख्याती होती.

अजित वाडेकर यांनी आपल्या आठ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत धडाकेबाज डावखुरी फलंदाजी व कुशल नेतृत्वाने ‘टीम इंडिया’ला गौरवशाली मालिका विजय मिळवून दिला. १९६८ साली नवाब टायगर पतौडीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला. यात मा.अजित वाडेकर यांची बॅट सूर्यासारखी तळपली. वाडेकरांनी ज्यात धो धो धावा कमवल्या त्यामुळे हिंदुस्थानने ती कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर हिंदुस्थानी संघ वेस्ट इंडीजबरोबर लढला. परदेशी भूमीवर भारतीय संघाला जेतेपद प्राप्त करून देणारे पहिले भारतीय कर्णधार म्हणून त्यांची ख्याती होती. तो दौरा होता अजित वाडेकरांच्या कर्णधारपदाच्या कौशल्याचा! वाडेकरांच्या संघाने वेस्ट इंडीजविरुद्धची विजयश्री खेचून आणली. त्यानंतर होता विश्वंविजेत्या इंग्लंडचा नंबर. या दौर्यात वाडेकरांच्या नेतृत्वाने इंग्लंडला चारीमुंड्या चीत केले.

अजित वाडेकर यांच्या फटक्यांचे यथार्थ वर्णन एका ब्रिटीश पत्रकाराने केले होते, Relaxed Silkiness. कसोटीतील निवृत्तीनंतर स्टेट बँकेत ज्येष्ठ अधिकारीपदावर काम करताना अजित वाडेकर यांनी निवड समिती सदस्य, अध्यक्ष व मॅनेजर अशा जबाबदाऱ्याही पार पाडल्या होत्या. भारत सरकारने अजित वाडेकर यांना १९६७ साली अर्जुन पुरस्काराने गौरविले होते. तर १९७२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अजित वाडेकर यांचे १५ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

Updated : 15 Aug 2021

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..