घालून पोतडीत
काळ उगा धावतो आहे
किती राहिली किती गेली
याचा हिशेब मांडतो आहे
एक सोनेरी आशा
उद्या म्हणून
वेडा जीव सुखावतो आहे
उद्या कधीही येत नसतो
आज हाच रोज उगवतो आहे
एकेक क्षण
प्रत्येकाच्या सुखदुःखाचा
सोबतीनं वाहतो आहे
हो प्रवाही सरितेसारखा
डबक्यात बेडके चिकार आहेत
एकेक दिस असा
जगून घे
जसा आज हाच अंत आहे
लेऊन तारुण्य सळसळते
वय हा फक्त आकडा आहे!!
वय हा फक्त आकडा आहे!!
— वर्षा कदम.
Leave a Reply