नवीन लेखन...

अकड़..

‘अकड़’ शब्द में कोई मात्रा नहीं होती हैं, 
पर ये अलग-अलग मात्रा में, हर एक इंसान में मौजूद होती हैं…

सारा निसर्गसंसार हा मानवी मनाचाच खेळ आहे. प्रत्येक माणूस हा सुख-शांतीच्या शोधात असतो. पण स्वतःचं मन, अंतरंग व त्यातून उत्पन्न होणाऱ्या वेगवेगळ्या छटा, भाव-भावना, आचार-विचार व वेगवेगळी केलेली चांगली-वाईट कृत्ये.. या सर्वांच्या ‘मुळाशी त्याचं मनच आहे’, याच भान त्याला रहात नाही. म्हणून मनावर संयम ठेवणं हे फार आवश्यक असतं. ‘मन चिंती ते वैरी न चिंती।’ मनातील चिंतनावरच आपली ऊर्ध्वगती किंवा अधोगती ठरत असते. म्हणून उन्नत जीवनासाठी सकारात्मक विचारांच्या आहाराची गरज असते. नकारात्मक विचार माणसाला दुर्बल बनवतात.

आजकाल हेकेखोर स्वभाव व जुळवून घेणे जमत नसल्याने अनेकांची अवस्था ही ‘अस्थिर’ झालेली दिसते. जुळवून घेता आलं नाही तर न्यूनगंड वाढतो, मन:शांती बिघडते, सारासार विवेकबुद्धी नष्ट होते व इतरांशी आपले संबंध दुरावतात. कुठं जुळवून घ्यायचं व काय बदलायचं हे समजण्यासाठी प्रज्ञेची कास धरली पाहिजे. माणसाच्या आयुष्यात चढ-उतार असतातच, त्याला परिस्थितीशी जुळवून घेता आलं पाहिजे. जुळवून घेण्यास असमर्थ ठरणे हे मानसिक दौर्बल्य आहे. हे दौर्बल्य दूर करण्यासाठी मनाच्या सबलतेची व निर्मलतेची गरज असते.

एखादी व्यक्ती आपला अपमान करते, मनाविरुद्ध वागते, नाहक त्रास देते हे ओझे आपण वर्षानुवर्षे घेऊन बसतो. काहीजण तर म्हणतात.. त्याने माझा असा अपमान केला, सात जन्म विसरणार नाही. जन्मभर असे विचार करून आपणच आपली हानी करून घेतो व अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. म्हणून ज्या गोष्टीमुळे आपले मन दुःखी होते, त्या गोष्टींना सोडून देऊन संबंधित व्यक्तीला क्षमा करणे म्हणजे आपणच आपल्यावर कृपा करून, आपले हित साधणे होय. इतरांनी केलेली हानी व अपमान आपल्याला सोडता आला पाहिजे. दुष्ट माणूस बदला घेण्याची, शहाणा माणूस माफ करण्याची व प्रज्ञावान मनुष्य दुर्लक्ष करण्याची इच्छा बाळगतो.

उत्तम, देखणे व्यक्तिमत्त्व आहे, फक्त म्हणून सर्व लोकांवर आपली भुरळ पडेल हा फाजील आत्मविश्वास/अहंकार बाळगू नका. कारण विचारांची श्रीमंतीच आदरास पात्र असते. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढचं करा, ‘चुकाल तेव्हा माफी मागा, अनं कुणी चुकलं तर माफ करा’. कारण, बादली पाण्यात झुकते तेव्हाच, ती भरुन वर येते. तसंच जो जीवनात झुकतो तोच मोठा होतो.
कवि बा. भ. बोरकर म्हणतात,

पक्व फळापरी ‘मी पण’ ज्यांचे आपोआप गळले रे,
जीवन त्यांना कळले रे.. जीवन त्यांना कळले रे…..

प्रज्ञावान व्यक्तीच्या आयुष्यात अक्कड, ऐट, मिजास, आव, डौल, दिमाख, नखरा आणि तोरा ह्या सर्व गोष्टींना अजिबात थारा नसतो. त्यामुळे एखाद्या माणसाच्या आताच्या स्थितीवरून न वागता, सगळ्यांशी प्रेमाने, आदराने वागले पाहिजे. आपल्याप्रमाणेच दुस-यालाही वृत्ती आहेत, आणि दुस-याप्रमाणेच आपल्यामध्येही व्यंगे आहेत. दुस-याने जर आपल्याशी सांभाळून वागावे असे आपणांस वाटते तर आपणही दुस-याशी तसेच वागले पाहिजे. जसजशी मनुष्याची प्रगती होते, तसतसा ‘अहंकाराचा दर्प’ त्याच्या अंतर्मनाला लागण्याची दाट शक्यता असते. म्हणून अहंकाराला तिलांजली देऊन मानवतेचा स्विकार करणे हि खरी साधना होय.

आत्म्याने आत्म्याचा केलेला आदर म्हणजे मर्यादा. ती आपल्या कामात, व्यवहारात, राहणीमानात असायला पाहिजे. मर्यादा हि सृष्टीने दिलेली संस्कृती आहे, ती सर्वांनी पाळायलाच पाहिजे…..

#अकड़ ईमानदारी कीं हो, तो उचित मानी जाती हैं ..
…श्याम ??

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..