अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकिकरण होणे आपेक्षित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रिकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे साजरा केला जातो.
प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रिकरण कमीवेळा झाले. अखंड भारत या संकल्पनेत, भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ व ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूटान,हिमालय,श्रीलंका आहे. भारत हा प्रचिन देश आहे. विविधतेने नटलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती आणि धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात. सध्या आपण जो भारत बघतो, तो प्राचिन काळी जरा वेगळा होता. म्हणजेच भारत एक विशाल देश होता.
इराणपासून इंडोनेशियापर्यंत त्याचा विस्तार होता. हिंदू धर्माचा तेव्हाच्या जागतिक राजकारणात दबदबा होता. पण काळाच्या ओघात भारताचे आणि हिंदू धर्माचे लचके तोडण्यात आले. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात तसेही एक प्रकारची सांस्कृतिक, ऐतिहासिक समानता आहे. शेकडो वर्षापूर्वी भारत देश एक महाकाय हिंदुस्थान देश म्हणून जगाला परिचित होता. इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी १८७६ ते १९४७ या ७१ वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले.
भारताचा सर्वात शेवटचा तुकडा १९४७ साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. त्यानंतर भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत आताचा बांगलादेश जन्माला घातला. १९४७ साली झालेली भारत व पाकिस्ताननची फाळणी ही मागील २५०० वर्षांतील देशाची २४ वीं फाळणी होती. ज्या राजांनी मागील २५०० हजार वर्षांत भारतावर आक्रमण केले त्यां नी अफगानिस्तान, मॅनमार, श्रीलंका, नेपाळ, तिबेत, भूटान, पाकिस्तान, मालद्वीप किंवा बांग्लादेशावर आक्रमण केल्याीचा उल्लेयख इतिहासातील कुठल्यााच ग्रंथात नाही. त्यालमुळे हे आताचे छोटे छोटे देश तेव्हा अखंड भारतात होते याला पुष्टीा मिळते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply