आला उन्हाळा आला घेऊन गरम गरम हवेच्या झळा
अंगाची करीत लाही जीवाची करीत काहिली
घामाच्या घेऊन धारा पंख्याचा शीतल वारा
तहानेने पाणी-पाणी शीतपेयांची आणीबाणी
सरबतांचा शितल मारा सगळे फ्रीजमध्ये सारा
आइस्क्रीमचा चाटा मलिदा सोबत थंडगार फालुदा
पेप्सी आणि कोकची जोडी गुलाबजाम वर कुल्फीची उडी
सर्दी खोकल्याची जोड गोळी उन्हाळ्याची दोस्तमंडळी
घराघरातून रहदारी उन्हाळी औषधांची घुसखोरी
डॉक्टरांची पायरी पाय ठेवायला जागा नाही वरी
आला उन्हाळा घेऊन गरम हवेच्या झळा
ये रे बाबा पावसा नको रुसून बसू असा
— विनायक अत्रे.
Leave a Reply