अमेरिकेत बोलपटांची निर्मिती सुरू होऊन तीन-चार वर्षे नाही झाली तोच भारतात पहिला बोलपट निर्माण केला गेला. आलम आरा या पहिला भारतीय बोलपटाने १९३१ च्या मार्चमध्ये करण्याचा मान मिळवला.
१४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ मुंबईच्या ‘मॅजेस्टिक’ सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केले. सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली. या चित्रपटाचे निर्माते अर्देशीर एम् इराणी होते. त्यात झुबेदा व मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका बरोबर, जिल्लो, सुशीला आणि पृथ्वीराज कपूर यांनी भूमिका साकारल्या होत्या.
सिनेमाची कहाणी जोसेफ डेव्हिडने लिहिली होती, तसेच याचे दिग्दर्शन अर्देशिर ईराणीने लिहिली होती. १२४ मिनीटांचा हा सिनेमाला इम्पीरिअल मूव्हीटोन नावाची प्रॉडक्शन कंपनीने निर्मित केला होता. या पहिल्या बोलपट सिनेमातून संगीताला उत्तम स्थान मिळाले. ‘आलम आरा’मध्ये सात गाणी होती आणि याच सिनेमाचे ‘दे दे खुदा के नाम पे’ भारतीय सिनेमाचे पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खानने गायले होते. ‘बदला दिलवाएगा या रब, ‘रूठा है आसमान’, ‘तेरी कातिल निगाहों ने मारा’, ‘दे दिल को आराम’, ‘भर भर के जाम पिला जा’, और ‘दरस बिना मारे है’ सिनेमाची ही इतर गाणी होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply