जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले गेलेले नोबेल पारितोषिक स्विडीश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाते. आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म १३ ऑक्टोबर १८३३ रोजी स्टॉकहोम येथे झाला. त्यांचा मृत्यू १० डिसेंबर १८८६ रोजी झाला.
आल्फ्रेड नोबेल यांनी सैन्याच्या कामासाठी डायनामाईटचा शोध लावला. युद्धाबरोबरच खाणी, रस्ते तयार करण्याच्या कामातही त्याचा वापर होऊ लागला.
नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वत शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले.यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आफ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधूचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामाइटचा शोध लावला.
डायनामाइटच्या शोधामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले. यातून नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वत: इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्या कारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्विडीश क्रोनरचा निधी देऊन ट्रस्ट स्थापन केला व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देण्याचे सुरू केले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.
नोबेल यांना विज्ञानाबरोबरच साहित्य, कला, शांतिकार्य या क्षेत्राचीही आवड होती. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा योग्य बहुमान व्हावा असे त्यांना वाटे. त्यामुळेच त्यांनी मृत्यूपत्र लिहतांना नोबेल पारीतोषिकाची व्यवस्था केली. त्यांनी आपल्या उत्पादनाच्या ९४ टक्के रक्कम या विविध पुरस्कारांसाठी राखून ठेवली.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९०१ पासुन हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. शांतिकार्य, साहित्य, पदार्थविज्ञन, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र व अर्थशास्त्र ह्या विषयात संशोधन करणार्यांना नोबेल पुरस्कार दिले जातात.
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply