नवीन लेखन...

अल्जीब्रा..

शाळेत असताना बहुतेकांच्या जिवाचा थरकाप उडवणारा ‘अल्जीब्रा’ विषय म्हणजे सोप्या मराठीत बीजगणीत..!!

‘अल्जीब्रा’ हा शब्द आपण इंग्रजी आहे असे समजत असलो तरी तो मुळ अरबी शब्द
‘अल ज़ब्र’ या शब्दावरून तयार झाला आहे. या शब्दाचा अरबी अर्थ ‘तुटलेले भाग जोडणे’ असा आहे. गणितात नाही तरी आपणं दुसरं काय करतो..?

अरबी गणितज्ञ ‘अबु ज़फ्र मुहम्मद इब्न मुसा अल ख्वारीझ्मी’ याने ९ व्या शतकात लिहीलेल्या गणितीसूत्रांवरील ग्रंथास नांव देताना हा शब्द प्रथम वापरला व या ग्रंथाचे नांव होते ‘क़िताब अल-ज़ब्र वल् मुकाबला’ म्हणजे इंग्रजीत ‘Rules of Reintegration and Reduction’.

या पुस्तकाच्या नांवातला पुढचा-मागचा शब्द पुढे काळाच्या ओघात मागे पडले व
‘अल-जब्र’ असा शाॅर्टकट रूढ झाला. पुढे हा शब्द अरबांकडून युरोपीय देशांत गेला व ‘अल्जीब्रा’ असा स्थीर झाला.

अरब लोक खगोलशास्त्र व गणित यात त्या काळातील इतर लोकांच्या मानाने खुप पुढे होते, अपवाद फक्त भारतीयांचा..!

जाता जाता-

अरबी ‘जब्र’ शब्दाचा मराठी उच्चार आपणं ‘जबर’ असा करतो. मराठी जबर म्हणजे समर्थ, मोठा किंवा कठीण! (म्हणूनही कदाचीत गणिताला ‘अल-जब्र’ म्हणत असावेत..!!
जबरदस्त, जबरी, जबरा इ. मराठी शब्दांचा जन्मदाता हा मुळ अरबी शब्द आहे.

आपलं तोंड म्हणजे ‘जबडा’ हा शब्दही बहूदा या शब्दातूनच जन्मला असावा असा माझा अंदाज आहे कारण जबड्यातच ‘जबान’ असते आणि ती ‘जबरदस्त’ही असते नाही का?

-गणेश साळुंखे
९३२१८११०९१

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on अल्जीब्रा..

  1. नमस्कार.
    माहितीपूर्ण लेख. अनेकांना ही माहिती नसेल.
    – माझ्याकडे कांहीं माहिती आहे ती देत आहे ( क्षमस्व; पण कांहीं माहिती भिन्न आहे. नाराजी नसावी).
    – आपण, ‘ ज़ब्र’ म्हणजे तुटलेले भाग जोडणें’ असा अर्थ दिला आहे. तो आपल्याला कुठल्यातरी लेखात किंवा शब्दकोशात मिळाला असणार. ( त्याचा रेफरन्स दिल्यास आभारी होईन, हें मी केवळ, माझ्या स्वत:च्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचारत आहे. गैरसमज नसावा).
    – परंतु, उर्दूच्या २ डिक्शनर्‍यांमध्ये ‘ ज़ब्र’ असा शब्द नाहीं. एक शब्दकोश आहे, ‘मद्दाह’ यांचा उर्दू-हिंदी कोश , व दुसरा आहे श्रीपाद जोशी यांचा उर्दू-मराठी कोश . मद्दाह हे महापंडित होते, व त्याचे अरबी-उर्दू , फारसी-उर्दू , व अन्य शब्दकोश आहेत. श्रीपाद जोशी हेही बहुभाषाकोविद आहेत, व त्यांचेही बरेच शब्दकोश आहेत. ‘ज़ब्र’ (नुक़त्यासहित) असा शब्द जर अरबीत असता, तर तो तसाच उर्दूतही आला असता, व तो शब्दकोशांनध्येही आला असता ( असें माझ्या अल्पमतीला वाटतें. )
    – एक शब्द आहे ‘ ज़बर’, ज्याचे अनेक अर्थ आहेत. त्यातील कांहीं :
    बलवान, शक्तिशाली, वजनदार ; जुलूम, अत्याचार.
    -दुसरा शब्द आहे ‘जब्र’ ( नुक़ता नसलेला) . त्याचा अर्थ आहे : जुलूम, अत्याचार.
    – बीजगणिताला अरबीमध्ये ‘ जब्र-ओ-मुक़ाबला’ म्हणतात. ( अें शब्दकोश सांगतो). खरें तर, हा ‘ओ’ जो आहे, त्याचें मूळ रूप ‘व’ असें आहे.( मराठीतील ‘व’ हा डायरेल्ट अरबीमधून आलेला आहे ( फारसीद्वारें नाहीं) , हें देवीसिंह चौहान यांनी दाखवून दिलेलें आहे.
    – आपण ज्या ९ व्या शतकातील ग्रंथाचें नांव दिलेलें आहे, तें,
    ‘ किताब ( नुक़ता नाहीं) जब्र ( नुक़ता नाहीं) व ( वल् असें नसणार) मुक़ाबल: ’
    असें असायला हवें. ( मुक़ाबल: चें च मुक़ाबला होतें).
    – अरब हे मध्ययुगारंभी युरोपियन्स् च्या पुढे होते, ही गोष्ट खरी आहे. ‘बर्बर’ या उत्तर आफ्रिकेतील टोळ्यांनी युरोपचा भूभाग पादाक्रांत केला. आजही, स्पेन व दक्षिण युरोपमध्ये आजही Local मुस्लिम आहेत, याचें तेंच कारण. इंग्लिशमध्ये Barabarians म्हणजे अप्रगत, जंगली असा अर्थ आहे, पण तो आकस व धार्मिक आणि राजकीय वैरातून निर्माण झालेला आहे, हें उघड आहे. ( अन्य युरोपीय भाषांचेंही तसेंच असणार).
    – मात्र, अरबांनी बरीच माहिती भारतातून घेतली, हें सर्वमान्य सत्य आहे. उदा. गणितातील ‘शून्य’. तसेंच, ज्यांना युरोपीय लोक Arabic Numerals म्हणतात, तेही भारतीयच आहेत. Chess ( शतरंज, बुद्धिबळ ) हेंही भारतातूनच गेलें आहे, हें अातां सर्वमान्य आहे. ‘पंचतंत्रा’चें अरबी व तेथून फारसीत भाषांतर झालेलें आहे (‘कलीना व दमना’ किंवा तत्सम नांवानें). आतां तर असेंही म्हटलें जातें की, ईसप ( इसाप) नांवाची व्यक्तीच काल्पनिक आहे, व खरें तर ‘Aesop’s Fables’ हें पंचतंत्रावरूनच घेतलेलें रूप आहे. त्या म्हणण्या कांहीं तथ्य असावें.
    – अन्य एक गोष्ट. ‘अल्’ हा प्रत्यय हिब्रूमध्येसुध्दा आहे. यहुदी ( ज्यू) व अरब हे दोघेही ‘सेमेटिक रेऽस’ ( Semitic race) आहेत, म्हणजेच दोहोंची ancestry एकच आहे. त्यातून, ज्यूंची संस्कृती ही अरबांपेक्षा खूप जुनी आहे. अरबांच्या फिरत्या टोळ्या होत्या, तेव्हां ज्यूंची संस्कृती प्रगत झालेली होती. तेव्हां, अल् हा प्रत्यय अरबीत हिब्रूनधून आला असणें नक्कीच शक्य आहे ( व ते २००० वर्षांपूर्वी झालेलें असणार ) अरबीतून युरोपध्ये जाण्याचा काळ म्हणजे इ.स. १०००नंतरचा , क्रूसेडस् चा, व त्यानंतरचा मध्ययुगाचा काळ.
    – जसें algebra, तसेच Elixir हा शब्दही अरबीतून युरोपमध्ये गेलेला आहे. मूळ शब्द आहे , अल्-अक्सीर. (नुक़ता नाहीं). अक्सीरवरूनच मराठीतील अक्शीर हा शब्द आलेला आहे. असो.
    – जबडा हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. ‘लोकभारती बृहत् प्रामाणिक हिन्दी शब्दकोश’ सांगतो की, जबडा,( हिंदी : जबड़ा ) याचा मूळ संस्कृत शब्द आहे ‘ज्रंभ’ .
    स्नेहादरपूर्वक,
    सुभाष स. नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..