नवीन लेखन...

अष्टपैलू दत्तू फडकर

भारताचे माजी अष्टपैलू दत्तू फडकर यांचा जन्म १२ डिसेंबर १९२५ रोजी कोल्हापूरमध्ये झाला.

मुंबईच्या रॉबर्ट मनी हाय स्कुल मध्ये दत्तू फडकर यांचे शालेय शिक्षण झाले तर त्यांनी बी. ए. ची पदवी एल्फिंस्टन महाविद्यालयातून घेतली.

फडकर उजव्या हाताने फलंदाजी करणारे फलंदाज, उजव्या हाताने जलद मध्यमगतीने आणि चेडू दोन्ही बाजुने वळवू शकणारे गोलंदाज आणि प्रामुख्याने स्लीप मध्ये उभे राहून क्षेत्र रक्षण करणारे असे बहु आयामी खेळाडू होते. वयाच्या १० व्या वर्षी आंतर शालेय सामन्यात फडकर यांनी १५६ धावा काढल्या. तर आपल्या महाविद्यालयीन सामन्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्यांनी २७४ धावा फटकाविल्या. मुंबई विद्यापीठाकडून ते १९४१-४२ आणि १९४६-४७ च्या मोसमात खेळले.

वयाच्या १७ व्या वर्षी दत्तू फडकर मुंबई संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळावयास लागले. १९४८-४९ च्या मोसमात महाराष्ट्र विरुद्ध खेळतांना फडकर यांनी आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीची झलक दाखविली. त्यांनी अनुक्रमे १३१ आणि १६० धावा काढल्या तर दोन्ही वेळा ३-३ खेळाडू बाद केले. फडकर यांनी १९५०-५१ च्या मोसमात महाराष्ट्र विरुद्ध काढलेल्या २१७ धावा हा त्यांचा वैयक्तिक उच्चांक होता. १९४७-४८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी फडकर यांची निवड भारताच्या राष्ट्रीय संघात करण्यात आली. यातील पदार्पणाच्या सिडनी येथील कसोटी सामन्यात फडकर यांना आठव्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी संघास गरज असतांना ५१ धावा काढल्या आणि गोलंदाजीत १४ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. पुढील ऍडलेड येथील सामन्यात फडकर यांना साहव्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविण्यात आले. तेव्हा विजय हजारेसह खेळतांना १२३ धावा काढत १८८ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. या मोसमात खेळल्या गेलेल्या चारही सामन्यात दत्तू फडकर यांनी किमान ५० धावा तरी काढल्या आणि लिंडवॉल सारख्या गोलंदाजाचा समाचार घेतला. याच्या पुढील वर्षी चेन्नई येथे वेस्ट इंडिज विरूद्ध खेळतांना फडकर यांनी १५९ धावांच्या मोबदल्यात ७ गडी बाद करत आपला गोलंदाजीचा विक्रम नोंदविला. हा सामना भारताने केवळ सहा धावांनी गमाविला, फडकर ३७ धावांवर नाबाद राहिले. १९५२ साली इंग्लंड विरूद्ध खेळतांना भारताची परिस्थिती वाईट होती, ० धावांवर ४ गडी बाद झाले होते. त्यावेळी फडकर-ह्जारे जोडीने १०५ धावांची भागीदारी करत भाराताची बाजु सांभाळण्याचा प्रयत्न केला. कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती पत्करल्यानंतर फडकर यांनी कोलकाता येथे एक शाळा काढली. त्यांनी काही काळ टाटा सन्स आणि भारतीय रेल्वे मध्ये नोकरीही केली. १९७० साली भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यांना खेळाडूंचे निवड कर्ता म्हणून नेमले होते. दत्तू फडकर यांनी ३१ कसोटीत १२२९ धावांसह ६२ विकेट घेतल्या. मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज अशी त्यांची ओळख होती.

दत्तू फडकर यांचे १७ मार्च १९८५ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..