नवीन लेखन...

अंबानी (विनोदी लेख)

सर्वात श्रीमंत भारतीय हे बिरुद सतत ११व्या वर्षी मिळाल्याच कळताच मी त्याला फोन करण्यापूर्वीच मुकेशचा फोन माझ्या फोनवर खणखणला. आनंदाच भरत येउन त्याचे शब्द थरथरत होते. मला म्हणला ” पक्या, लेका हेलीकॉप्टर पाठवतोय लगेचच एंटिलियावर ये; केंव्हा एकदा तु भेटशील अस झालय. येताना छाया भाभीलाही घेउन ये ” मैत्रीचा उमाळा आलेल्या मुकेशच मन मी मोडु शकलो नाही. शुचिर्भुत होउन, नीताभाभीनी दिलेला मुंबई इंडियन्सचा ड्रेस चढवला आणि माझ्या सोसायटीच्या टेरेसमधे हेलीकॉप्टरची वाट बघत दोघही थांबलो. कोकिळाबेनला हिच्या हातची थालीपिट खूप आवडतात तीही हिनी बरोबर ठेवली.

हेलिकॉप्टर लांब दिसत होत पण केबलच्या वायर आणि अँटेनाच्या गुंत्यात हेलीकॉप्टर कस उतरणार याचिच मला चिंता लागली. हिची रंगित ओढणी हवेत फिरवत मी हेलिकॉप्टरला दिशा दाखवायला लागलो. शाळा बुडवुन कबुतर उडवायचो तो अनुभव कामी आला. हिचे हातवारे आणि माझ्या शिट्यांनी हेलिकॉप्टरला एकदाचे आम्ही दिसलो आणि दोन चार केबल तुटल्या; हिसक्यानी टेरेसमधल्या काही अँटेनाही कोलमडल्या पण शेवटी कॉफ्टर लँड झाले.

कॉफ्टरमधे सगळच ओपन असल्याच लक्षात न येउन मी उगाचच खिडकी पकडायची घाइ केली. कॉप्टर चालवणारा पायलट का ड्रायव्हर ह्यात मी गडबडलो आणि काका या जेनरिक टर्मवर मी संभाषण चालु केल. वाटेत तुम्हाला झोप बिप आली तर कुठेही उतरुन चहा घ्या, पैसे मी देइन असा वडीलधार्याचा सल्लाही दिला.

२५व्या मिनीटाला अटलांटाच्या गच्चीवर होतो आम्ही. सुटाबुटातल्या दोघांनी सँडविच आणि कोकम अॉफर केल मी नको म्हणल आणि त्यापेक्षा वॉशरुम दाखवा म्हणल. वा-यानी विसकटलेले केस व्यवस्थित केले आणि काखेत डिओडर मारुन आमच्यासाठी थांबलेल्या अंबानी फँमिलीला भेटायला २६ व्या मजल्यावर जिन्यानी उतरलो.

मुकेशशी गळाभेट झाली. दोघांनाही आनंदाश्रु अनावर झाले. कोकिळाबेनना दोघांनी वाकुन नमस्कार केला आणि हिनी थालीपिटाचा प्लास्टिकचा डबा त्यांच्या हातात ठेवला. नीताभाभीलाही मी नमस्कार केला आणि हिनी हळदकुंकु लाउन ब्लाउज पीस दिला.

नीताभाभीनी त्यांच्या नाना नानींशी ओळख करुन दिली. मी विचारल टीनाभाभी येणार आहे का? तर म्हणाली ती ना येइल ना. आनिलभाई रफेलमधुन सुटले तर तेही येतो म्हणलेत अस हळुच अँड केल. निता, नाना, नानी, टीना, अनील आणि त्यात भर अंबानी ह्या सगळ्या नावांमुळे माझ्या मनात विचार आला की औद्योगिक क्षेत्रातल्या मक्तेदारी बरोबर अंबानींनी ‘न’च्या बाराखडीवरही मक्तेदारी मिळवलीय! गप्पा खूप रंगल्या. रेशमासारखा मउ जाळीदार ढोकळा किचनट्रालीवरुन आला. लिंंबाच्या सालीइतपत पिवळसर रंगाचा खानदानी ढोकळा मी हात लावताच लाजाळु सारखा लाजला. नको नको म्हणत भरपूर खाण झाल. कोकिळाबेननी सोफ्यावर पाय घेउन थालीपिटावर ताव मारला; खूपच छान झालय म्हणल्या. मी ही नीताभाभीला म्हणल ढोकळा छान मोकळा झालाय!

छोट्याशा पॉझनतर मुकेश म्हणला चल पक्या तुम्हाला घर दाखावतो. मी म्हणल पून्हा कधीतरी येउ. हो नाही करता करता तो तयार झाला आणि बंगला आणि त्यातील सोयीं सुविधांविषयी एक पुस्तकच दिल. ” माझा पर्सनल स्टाफ ६०० आहे ६ गार्डनसाठी ६ माळी आहेत ” म्हणला. मी विचारल अरे पण हे सगळे पूर्णवेळ बिझी असतात का तर म्हणला कोणीही timepass करुच शकत नाही इथे. माळ्यांना सुध्दा गार्डन व्यतिरिक्त स्टाफच्या मिशा मेंटेन करायची जबाबादारी दिलीय.

मी म्हणल आम्ही खरच निघतो आता. उशीर होतोय. आज माझी थर्ड शिफ्टय. V T ला ड्रॉप केल तर सींहगड एक्सप्रेसनी जाउ आम्ही. तुम्हीच पुण्याला आलात की नक्की या आमच्याकडे. आकाश, आनंत, इशालाही घेउन या. चल Bye. Jug jug JIO!

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

2 Comments on अंबानी (विनोदी लेख)

  1. प्रकाशजी निता वहिनींच्या तोंडी अनिलला दिलेल्या पैशांचा उल्लेख आला असता तर अजून छान झाले असते. असो आपण Beharam Contractor, Editor of Afternoon Newspaper his articles Round and About as a Busy Bee वाचावीत त्यापासून आपणास वेगवेगळ्या कल्पना सुचू शकतात आणि आपले पु.ल. आहेतच.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..