पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने
पित्याचे लक्ष वेधण्या, हनवटी खेची हातानें….१,
प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे
अजाणपणा दाखवोनी, दुर्लक्ष करी मुलाकडे…२,
शब्दांची गुंफन करूनी, कवितेचा संग्रह केला
तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला…३,
जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते
अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते…४,
पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले
रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले…५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
लेखकाचे नाव :
डॉ. भगवान नागापूरकर 9004079850
लेखकाचा ई-मेल :
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply