गिरगावातील रस्त्यावरी
दोन देवळांच्या शेजारी
‘आर्यन’ आहे आमची शाळा
जेथे ज्ञान मिळते बाळा
नाव शाळेचे लहान आहे
लहानथोरांच्या मुखी आहे
येथून शिक्षण घेऊन गेले
देशमुखांदी मोठे झाले
आम्हीही शिक्षण घेऊन जाऊ
परंपरा त्यांची पुढे चालवू
सर्वांना जी समान मानते
ती शाळा मला खूप भावते
शाळा ही आवडती असे
अभिमान तिचा हृदयी वसे
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९७४)
Leave a Reply