देवावर विश्वास नसलेले किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवाले विचारतात की देव कुठे आहे, कुणी बघितलाय का?
पण मग वैज्ञानिकांना हे विचारा की त्यांनी अणू, परमाणू, इलेक्ट्रॉन यातलं काहीतरी बघितलंय का?
जे दिसत नाही ते नसतं आणि जे दिसतं तेच शास्वत असतं हा साधा नियम.. त्याला अपवाद कशाला? दुसर्यांच्या श्रद्धांवर टिका करुन आपल्या पोळ्या कशासाठी भाजायच्या?
हिंदू धर्मातच अंधश्रद्धा आहे असं थोडंच आहे? ख्रिश्चन तर सर्वाधिक अंधश्रद्ध आहेत. उगाच का हजारो वर्षापूर्वीचं प्रेत उकरुन काढून त्याच्या दर्शनासाठी मैलोन-मैल रांगा लावतात? ख्रिश्चन धर्मात संत असल्याचा दाखला मिळवण्यासाठी चमत्कार करुन दाखवायला लागतो. मात्र अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचं याच्याकडे लक्ष कधी गेलंय का? चमत्कार दाखवला नाही म्हणून मदर तेरेसांना संतपद देणं रखडवून ठेवलं होतं म्हणतात.
वसईजवळ अनेक प्रार्थनास्थळं आणि प्रार्थनाकेंद्रांचं जाळं आहे. तिथे सर्रास बुवाबाजी चालते. अंगात भूत आलेल्या माणसांची भूतं काढण्याचे प्रकार तिथे चालतात. उभ्या असलेल्या मानसांना आडवे पाडून त्यांच्या अंगात भूत होतं ते पळवून लावलं असं सांगण्याचे प्रकारही तिकडे होतात. अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांचं तिकडे कधी लक्ष गेलेलं दिसत नाही. कदाचित लक्ष गेलंही असेल पण वरुन बांबू आला असेल आणि त्यांची तोंडं बंद झाली असतील.
खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यामधल्या काही वाहिन्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार करतात. त्यातही अनेकदा अंधश्रद्दा पसरवणारे प्रकार असतात.
सुनील वर्तक
Leave a Reply