न्यूयार्कच्या विमानतळावर एक गोष्ट मला जरा खटकली. आमची वरात (वरात म्हणजे व्हीलचेयर वरली बायको, त्यामागे चेयर ढकलणारी कन्या, तिचा सोबत त्या चेयरला अडकवलेल्या आमच्या चाकाच्या बॅगा,आणि त्याच्या मागे हातात पासपोर्ट घेऊन मी.) सामानासकट कार्गोच्या लाईनीत होतो. तिथे गर्दी होतीच. ती मॉनिटर करायला एक आफ्रिकन अमेरिकन ऑफिसर बाई होती. तिला माझे मोकळ्या हाताने चालणे आणि एका अमेरिकन व्यक्तींनी आमच्या लगेज मॅनेज करणे रुचले नसावे. तिने त्या व्हीलचेयरवाल्या पोरीला सांगून, चेयरला अडकवलेली मोठी बॅग माझ्या हाती सोपवली. मला हे थोडस लागलं. पण जरा विचार केल्यावर असे कळले कि, हा अनुभव आपल्याला नवा नाही. लोक सहसा परक्या ठिकाणी स्वीकारत नाहीत. मी नगरला वास्तव्य करून आज वीस वर्ष होऊन गेलेत. मी नगरला माझं गाव म्हणून स्वीकारलंय. पण नगरचे लोक अजून ‘मराठवाड्याचे’ म्हणूनच पाहतात. फक्त मराठवाड्यात असे होत नाही. येथील लोक चटकन सामावून घेतात. असो.
०००
आपल्या पुणे-बेंगलोर विमानासारखेच न्यूयार्क-ऑस्टिनचे विमान होते. सीटवर स्थानापन्न झाल्यावर विमानाच्या खिडकीतून बाहेर पहिले तर चांगले उजडले होते. परदेशाच्या भूमीवरील पहिला सूर्योदय! पण या सूर्योदयात, आपल्या भारताच्या सर्योदयात असतो तसा रसरशीत तजेला नव्हता. काहीशी उदास छटा होती, किमान मलातरी, वाटली.
०००
आपल्या पुणे-बेंगलोर विमानासारखेच न्यूयार्क-ऑस्टिनचे विमान होते. सीटवर स्थानापन्न झाल्यावर विमानाच्या खिडकीतून बाहेर पहिले तर चांगले उजडले होते. परदेशाच्या भूमीवरील पहिला सूर्योदय! पण या सूर्योदयात, आपल्या भारताच्या सर्योदयात असतो तसा रसरशीत तजेला नव्हता. काहीशी उदास छटा होती, किमान मलातरी, वाटली.
कमरेचे बेल्ट बांधले, विमानाने टेकऑफ केले. हा प्रवास तीन तासाचा होता. शेवटचा टप्पा. मग लगेज घ्यायचे, विमानतळाबाहेर पडायचे. मुलगा येणार होता, त्याच्या गाडीत बसायचे अन घरी जायचे. विमान सुरु झाल्यावर, चहाची ट्रॉली घेऊन एक जाड्या ‘हवाई सुंदर’ आला. आमच्या लहानपणी, बायकांत टुणटुण आणि पुरुषात पोल्सन ढब्बु, म्हणून प्रसिद्धी होते. हे दोन विनोदी सिनेकलावंत म्हणजे माझे, कमाल जाड व्यक्तीचे मापदंड! तर पोल्सन सुद्धा या ‘सुंदरा’पुढे झिरो फिगर वाटला असता, अशी याची शरीर प्रकृती! बनपावसारखे गाल, कमरेचा घेर सीटच्या दोन रो मध्ये, जेमतेम मावत होता. हा बाबा विमानात म्हणजे, विमानाला इंधन ज्यादा लागणार, वर विमान लेट पण होणार.(इंधनाचा माहित नाही, पण विमान मात्र दीड तास लेट झाले होते!)
माझ्या शेजारी आल्यावर तो तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटला. त्यातलं ‘व्वा ‘ तेव्हडा मला काळाला. या माझ्या बहिरेपणाचा एक फायदा, नक्कीच झालाय. समोरचा काय म्हणतोय, याचा मी बऱ्यापैकी अंदाज बांधू शकतो. हा ‘मला काय हवंय?’ म्हणजे ‘व्हॉट’ विचारत असावा.
“टी.”
“ओली?”
“टी.”
“ओली?”
हे ओन्ली असावे.
मी मुंडी हलवली. वेळ सकाळची होती. हवेत, म्हंजे विमानात एसीचा, गारवा होताच. म्हटलं बाहेरच्या उगवतीचा, चहा सोबत आनंद घ्यावा.
वीतभर कागदी पेल्यात त्याने दिलेला चहा घेतला, मी गिलासात डोकावून बघितलं तर, काळ पाणी! तो तोवर पुढे सरकला होता. मी त्याचा मागून कोट खेचला.
मी मुंडी हलवली. वेळ सकाळची होती. हवेत, म्हंजे विमानात एसीचा, गारवा होताच. म्हटलं बाहेरच्या उगवतीचा, चहा सोबत आनंद घ्यावा.
वीतभर कागदी पेल्यात त्याने दिलेला चहा घेतला, मी गिलासात डोकावून बघितलं तर, काळ पाणी! तो तोवर पुढे सरकला होता. मी त्याचा मागून कोट खेचला.
“मिल्क?” मी विचारले.
त्याला कळले नाही. त्याने दोन ‘शुगर’ लिहलेल्या पुड्या अन एक चाटू सारखी काडी माझ्या हातावर ठेवली! मिल्क ऐवजी मी डेयरी व्हाईट्नर म्हणायला पाहिजे होत, असे मला नन्तर वाटले. म्हणजे माझ्या पेल्यात जे होते तो फक्त ‘चहा’ होता! गरम पाण्यात चहाची भुकटी उकळलेली! आपल्या भाषेत -डिकाशन! आता मला त्याच्या ‘ओली!’चा अर्थ कळाला. मी त्या दोन्ही साखरेच्या पुड्या त्यात घातल्या चाटून ते काळ पाणी ढवळलं, आणि त्या पाण्याची शिक्षा भोगायला, तो पेपरग्लास तोंडाला लावला.
पहिल्या घोटाला डोळ्यापुढे वाघमारे चमकून गेला! (आमचा मित्र, तो असलाच चहा पितो!) आणि हातात ग्लास धरून बसलो. रेल्वे सारख्या विमानाच्या खिडक्या उघड्या असत्यतर किती बरे झाले असते? हा विचार मनात येऊन गेला. पुन्हा तो ‘सुंदर’ रिकामे ग्लास गोळा करायला आला, तेव्हा माझा हाताची सुटका झाली!
अश्या प्रकारे अमेरिकेच्या ऑस्टिन विमानतळावर एकदाचे विमान उतरले.
०००
०००
ऑस्टिन हे अमेरिकेतील टेक्सास राज्याची राजधानी. विमानतळा बाहेर, ठरल्या प्रमाणे मुलगा आला होता. विमानतळा बाहेर एका विशाल पार्किंग एरियात गाडी पार्क केलेली. प्रचंड मोठी पार्किंग एरिया होता. किती मोठा ? तर आपलीच गाडी कोठे पार्क केली आहे, हे गिपियस वर पहावे लागले! पार्किंग पासून एअरपोर्ट पर्यंत, येण्यासाठी पार्किंगवाल्यानी मिनीबसची सोया केली होती.
आमच्या गाडीत बसून आम्ही घरी पोहंचलो. एकदम हलके वाटले. डोळे लालभडक झाले होते. येथे जरी दुपार होती, तरी आमच्या शरीराची ती मध्यरात्र होती. आणि यासाठी झोपणे गरजेचे होते.
त्यानंतर आम्हाला कधीही झोप येऊ लागली. तसा मी निद्रानाशाच्या दरबारातला मान्यवर सरदार आहे. मला आमचा नातू ‘जागाळू’ म्हणतो. पण येथे आल्यापासून माझा कोला झाला होता. (कोला हा प्राणी, आठरा ते वीस तास झोपतो म्हणे!)
आठड्याभरात अमेरिकेतील निसर्गचक्रास आम्ही सरावलो. रविवारी झू बघण्यासाठी जाण्याचे ठरले.
आठड्याभरात अमेरिकेतील निसर्गचक्रास आम्ही सरावलो. रविवारी झू बघण्यासाठी जाण्याचे ठरले.
‘किती लांब आहे?’ मी मुलाला विचारले, म्हणाला ‘अहो, जवळच आहे.’ पण प्रत्यक्षात ते दीडशे किलोमीटरच्या आसपास होते! पण आठ पदरी चकचकित रस्ते, वेगवान तरी शिस्तबद्ध वाहतूक, आणि निरोगी वाहन. कोठे जबडा उघडून पडलेले, किंवा टांग वर करून, जॅक वर असलेली गाडी दिसली नाही.
मी पहिले पाऊल जेव्हा ऑस्टिन एअरपोर्ट बाहेर जमिनीवर टाकले, तेव्हा आपले नगरपण असेच स्वच्छ असावे असे वाटून गेले. आणि तसे ते दिसेल हि. फक्त प्रत्येकाने ते मनावर घेतले तर. आपले महामार्गहि, इथल्या इतके रुंद नसले तरीही, चांगलेच आहेत. येथील रस्त्यावर आपल्या इतके जाहिरातीचे प्रस्त दिसले नाही. रस्त्यावर केवळ दिशादर्शक, गरजेचे फलक मात्र आहेत, आणि तेही वाहन चालकाच्या नजरेच्याटप्प्यात सहज येण्याच्या उंचीवर. प्रत्येक चौकात ट्राफिक सिग्नलचे दिवे सुद्धा, रस्त्यावर आडवे टांगलेले असतात, जेणे करून गाडी चालविणाऱ्याला चटकन दिसतील. पोलवर रस्त्याच्या कडेला कोठेतरी, असा दिवा आढळला नाही. आपल्या शहरात झाडाच्या आडोशाला, ट्राफिक सिग्नल का लावले जातात माहित नाही. जगभरातले झाडे कापून काढणारी मंडळी, या झाडांना मात्र हात लावत नाही!
अमेरिकेतून आलेली मंडळी, येथील स्वच्छतेने खूप प्रभावित होतात. मीही झालो. अमेरिका खूप मोठा देश आहे. भारताच्या तिप्पट असावा. आणि लोकसंख्या त्यामानाने खूप कमी आहे. भारत असो कि अमेरिका कोणताही सरकार संपूर्ण देश स्वच्छ नाही ठेवू शकत. त्यात देशातील रहिवाशांचा सहभाग आवश्यक आहे. आपला भारतपण इतका स्वच्छ राहू शकतो. आपला सहभाग गरजेचा आहे. मी मुंबईला व्हिसासाठी गेलो होतो. अमेरिकन काउन्स्लेट असलेला, बांद्रयाचा भाग अमेरिकेइतकाच स्वच्छ आणि देखणा आहे. लांब कशाला पुण्याच्या बऱ्याच भागात हे देखणेपण मी पाहिलंय. जसे हडपसर मधील मगरपट्टा. म्हणजे आपण हे करू शकतो! तसेच राळेगण आणि हिवरे बाजार, या खेड्यांचा पॅटर्न इतर गावांनी का घेतला नाही. याचाही आपण विचार केला पाहिजे. आपली प्रगती आपला विकास आपणच करायला हवा. असो.
— सुरेश कुलकर्णी
(क्रमशः )
खूप छान शैली…