नवीन लेखन...

अमेरिकन घरं

आज अमेरिकेतील घरांसंबंधी लिहितो.

इथे साधारण तीनेक प्रकारची घर दिसतात. पहिला प्रकार अपार्टमेंट स्वरूपाचा. ती एक किंवा दोन मजली असतात. आपल्याकडे इमारती असतात तशी. त्यामध्येदेखील ऐसपैस जागा असते: रस्ते, टाकावू सामान एकत्र करण्याची केबीनस, पार्किंग एरिया, काही ठिकाणी जीम, रिक्रिएशन क्लब्ज, पोहोण्याचे तलाव, वॉशिंग लाँड्री, प्रशस्त फूटपाथस्, चालण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे पेव्हमेंटस्, रस्त्यालगत अनेक रंगीत फुलांच्या वेली, हिरवीगर्द लॉन्स, त्या त्या कॉम्प्लेक्सचे लिझींग ऑफिसीस यांनी परिपूर्ण होते. पुष्कळदा सुरूची झाडे आणि गुलाबांचे ताटवे आढळतात.

दुसरा प्रकार मालकीच्या घरांचा. त्यात ब्लॉक्स किंवा कोंडोज असतात. सारे इतर अपार्टमेंट काँम्प्लेक्ससारखे. तिसरा प्रकार (मालकीच्या) बंगल्याचा. ती सिंगल किंवा एक मजली असतात. या घरांच्या सभोताली लाकडी फळ्यांचे वा विटांच्या भिंतीचे कुंपण असते. मात्र दर्शनीभाग अनेकदा मोकळा असतो आणि तिथे फुलझाडांनी सारा परिसर सुशोभित केलेला असतो. उरलेल्या जागेत सुंदर कोवळी हिरवीगार लॉन असते. आठवड्यातून किंवा ठराविक दिवसांनी ती कापावी लागते. नाही तर बंगलो असोशिएशनच्या दंडास तुम्ही पात्र होता. बंगले स्वाभाविक लाकडाची असतात आणि बाहेरून त्यांना कोणता रंग द्यायचा हे असोशिएशनच्या नियमानुसार ठरत असते. घरांना अंगचेच (in built) दोन गाड्या ठेवण्याइतके गराज असते. घरांमध्ये वातानुकूलित हवा राहील याची व्यवस्था असते. म्हणजे उन्हाळ्यात एसी आणि हिवाळ्यात हीटर वापरता येतो. इकडे थंडीचे प्रमाण खूप. पूर्व भागात बर्फ पडतो. त्यामुळे घरांमधून flooring mats बसवलेले असते. घरात (पाण्याचा) हीटर असल्याने गरम पाण्याचीही सोय असते. रेल्वेसेवा असली तरी अनेकजण मोटार पसंत करतात. म्हणून प्रत्येक घरात दोन-तीन कार्स असतातच. अमेरिकन माणसाला पोहणे प्रिय आहे त्यामुळे अनेकांकडे घराच्या मागच्या बाजूला (backyard) एखादा लहान वा मोठा swimming pool असतो.

त्याशेजारी लहान झकुजीची सोय असते. एका छोट्या पुलामध्ये ज्यांना पोहता येत नाही ते आरामात पाण्यात डुंबू शकतात. अमेरिकन स्वानप्रेमी असतात. त्यामुळे त्यांच्या घरात कुत्र्याचा वावर असतो. प्रत्येक घरासमोर चार फूट उंचीच्या खांबावर पत्रांची पेटी (letter box) असते. अनेक घरांमध्ये internal security system बसवलेली असते. सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेली ती व्यवस्था असते.

अमेरिकेत पुष्कळशी घरं single storied असल्याने (हवामान लहरी नसल्यास) निरभ्र निळं आकाश कोणालाही सहज पाहाता येते आणि तो आनंद अवर्णनीयच असतो.

— डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..