बहनो और भाइयो
नमस्कार, आदाब, सतश्री अकाल,
मैं आप का दोस्त
अमीन सायानी
आज जो गीत पेश करने जा रहा हूँ
बहनो और भाइयो
वो गीत बिनाका गीतमाला की
पहली पायदान पे पहुँच गया है
तो बहनो और भाइयो
तैयार हो जाये
दिल थाम के बैठिये
,,जिसे लिखा है,हमारे
श्री आनंद बक्शी जी ने
संगीत से सवारा है
लष्मीकांत प्यारे लाल जी ने
,आवाज़ के जादूगर
हमारे प्यारे श्री,,मोहम्मद रफ़ी साहब
तो लीजिये गीत पेश ऐ खिदमत है
पिक्चर का नाम है,,,,,फ़र्ज़,,, गेली कित्येक वर्ष अमीन सयानी हे पडद्यामागे राहूनच श्रोत्यांचं मनोरंजन करीत आहेत. त्यांचा जन्म २१ डिसेंबर १९३२ रोजी झाला. एके काळी याच अमीन सयानीनी ‘आवाजकी दुनियाके दोस्तो’ अशी स्नेहपूर्ण साद घालून रसिकांच्या मनावर आणि हृदयावर ‘बिनाका गीतमाला’ या प्रचंड लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वर्ष राज्य गाजवलं होत. तोच लाघवी, आर्जवी आवाज अजूनही मंत्रमुग्ध करतो.
अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते. पुढे ते इंडियन नॅशनल काँग्रेसचे सभापती झाले. अमीन सायानी यांची आई गांधीजींची शिष्या होती. स्वतंत्र भारताला जो झेंडा भेटरूपाने देण्यात आला होता, त्या झेंडय़ावर स्वातंत्र्य संग्रामात सहभागी शंभर महिलांच्या सहय़ा होत्या. त्यात अमीन सायानी यांच्या आईची सही होती.
अमीन सायानी यांनी सिनेसंगीताचं सुवर्णयुग रेडिओ सिलोनच्या माईकसमोर बसून अनुभवलं. श्यामसुंदर, खेमचंद प्रकाश, हुस्नलाल भगतराम यांचा जमाना मागे सरला होता. गुलाम हैदर, नूरजहा ही मंडळी पाकिस्तानात निघून गेली होती. नौशाद, सी. रामचंद्र टॉपला येत होते. मा.अमीन सायानी लोकप्रिय गाण्यांचं गणित उलगडून सांगताना म्हणतात.
‘‘त्या वेळची परिस्थिती फार वेगळी नव्हती. त्या वेळेस तर गाणी ऐकण्याचे सोर्सेसही खूप कमी होते. गाणी ऐकायची तर सिनेमाला जाऊन बसायचं नाही तर रेडिओ सिलोन ऐकायचं, कारण केंद्रीय माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉक्टर बी. व्ही. केसकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर सिनेसंगीत वाजवण्यास बंदी घातली होती. त्याचाच फायदा सिलोनला मिळाला. तेव्हा गाणी ऐकण्याकरिता लोक सिनेमाला गेलेच नाहीत तर चांगली गाणी नाहीशी होत. कधी तरी उलटाच प्रकार घडत असे. फिल्मीस्तानचा ‘नागिन’ रिलीज झाला त्याआधी त्याची गाणी बाहेर आली नव्हती; पण गाणी वाजायला सुरुवात झाली आणि लोक ‘नागिन’ पहायला झुंडीने थिएटरवर जाऊ लागले. धीरे धीरे फिल्म हिट हो गयी और गाने भी धूम मचा गये.’’
हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात बिनाका गीतमाला ‘माइलस्टोन’च्या रूपाने उभी आहे आणि अमीन सायानी त्याचे अविभाज्य घटक. ३ डिसेंबर १९५२ ला बिनाका गीतमालाची सुरुवात झाली आणि चित्रपटसंगीताची थक्क करून सोडणारी अफाट लोकप्रियता जगासमोर आली. मा.अमीनभाई सांगतात. ‘‘त्या वेळेस ‘हिट परेड’ नावाचा इंग्लिश कार्यक्रम रेडिओ सिलोनवर होत असे. सहज एक कल्पना निघाली, हाच कार्यक्रम हिंदीतून पेश केला तर! एक प्रयोग म्हणून गीतमाला सुरू झाली. सात-आठ गाणी वाजवायची त्यांची क्रमवारी बदलून, लोकप्रियतेनुसार त्यांना नंबर देऊन ऐकणाऱ्यांनी जॅकपॉट जिंकायचा. त्या वेळेस टपाल, पत्रं एवढं एकच माध्यम होतं. रेडिओ सिलोनच्या अधिकाऱ्यांनी चाळीस ते पन्नास पत्रांची अपेक्षा ठेवत यंत्रणा सज्ज केली होती. प्रत्यक्षात नऊ हजार पत्रं आली. हा धक्का जोरदार होता आणि पहिलं वर्ष संपता संपता पत्रांचा आकडा (प्रत्येक आठवडय़ाला अर्थात) साठ हजारांपर्यंत पोहोचला.’’
बिनाका गीतमालाचा इतिहास मा.अमीन सायानी यांना पाठ आहे. शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहनपर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना आहे. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत मा.अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.
‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. आज वयाच्या ८४ व्या वर्षी अमीनभाई नव्या समालोचक-निवेदकांना कोणता सल्ला देतात?
‘‘प्राणायाम. सर्वाधिक बेस्ट. प्राणायाम से पूरे फेफडे साफ हो जाते है. आवाजात ताकद येते. स्टॅमिना वाढतो. ते म्हणतात मला मेहंदी हसननने सांगितलेला किस्सा आठवतो. त्यांनी गायक म्हणून करिअर करण्याचा निर्णय त्यांच्या वडिलांना, काकांना सांगितला तेव्हा दोघे हिरीरीने पुढे आले आणि त्यांनी मेहंदी हसनना दररोज हजार दंड-बैठका काढण्यास भाग पाडलं. हजारो मैल धावण्याचा सराव करण्याची सक्ती केली. मेहंदी हसनच्या मनावर एकच गोष्ट त्या दोघांनी बिंबवली- ‘जब तुम्हारा शरीर मजबूत नही तो तुम गा नही पावोगे.’ मी तर म्हणतो, कोणत्याही व्यवसायात शरीर का स्वस्थ होना जरूरी है बोलने मे तो और भी अच्छा है. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सिगारेट कधी पिऊ नका. मी सुरुवातीला चिक्कार सिगरेट पीत असे, अगदी ‘चेन स्मोकर’च्या पठडीत. प्रचंड प्रॉब्लेम्स निर्माण होत. ऐन वेळेला सर्दी-खोकला. त्याचा परिणाम आजही माझ्या शरीरावर दिसतो. हालांकी मै बरसो पहेले सिगरेट छोड चूका हू, पण दुष्परिणाम व्हायचे ते झालेच. अनाऊन्सर, गायक किंवा नट यांनी कधीही सिगारेटच्या वाटेला जाता कामा नये. उससे ज्यादा कोई खातरनाक चिज नही है.’’
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=c0g1waPEKJc
Leave a Reply