अमायनो ॲसिड साठवता येत नाही, हा अतिशय महत्त्वाचा शोध होता. डॉ. रोज याप्रमाणे नेहमी अमायनो ॲसिड शोधून त्याला नाव दिले. लेओनिन यांनी त्याला नाव दिले इसेंशियल अमायनो ॲसिड. असे डॉ. रोज यांनी पहिल्या प्रथम दहा अमायनो ॲसिड आणि त्याला विशेष नाव दिले. आता यात काही अमायनो ॲसिड बाहेरूच घ्यावी लागतात. ते म्हणजे अर्जिनीन आणि हिस्टीडीन. इसेंशियल अमायनो महत्त्वाचे म्हणजे आर्जिनीन व हिस्टीडीन न घेतल्यास शरीरावर विपरित परिणाम होतो. म्हणून डॉ. रोज यांनी इसेंशियल व नॉन इसेंशियल अशी अमायनो अॅसिड तयार केली.
इसेंशियल नॉन इसेंशियल
आयसोल्युसीन अॅलॅनीन
ल्यूसीन आर्जिनीन
लायसीन आस्पारटेट मेथिओनीन सिस्टीन
फिनाईल अॅलेनीन ग्लायसीन
थ्रेओनिन प्रोलीन
ट्रिप्ट्रोफेन सेरीन
व्हालीन अॅस्पेराजिन
ट्रायरोसीन पायरोलीन
सेलेनो सिस्टीन
अगदी त्याचप्रमाणे सिस्टीन, थ्रायरोसीन व आरर्जिनीन ही अमायनो अॅसिड आपल्या लहान मुलांना देणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी त्याचप्रमाणे आरर्जिनीन, ऑरलियीन व सिस्ट्रोलीन हे एकमेकापासून तयार होतात. अगदी त्याचप्रमाणे आर्जिनीन आणि हिस्टीडीन हे लहानमुलांना उंची वाढविण्याकरता अतिशय आवश्यक असते. अमायनो असिड काही प्रमाणात आपल्याला शरीरातून घेता येत नाही आणि म्हणूनच ही अमायनो जॅसिड बरोबर जेवणातून व इतर गोष्टीतून घेणे आवश्यक असते. तसेच आर्जिनीन, सिस्टीन, ग्लायसीन ग्लुटामाईन, हिस्टीडीन, प्रोलीन, सेरीन व टायसोरीन यांना कंडीशनल अमायनो ॲसिड म्हणतात. म्हणजे त्यांना प्रत्येकवेळी आपल्या आहारातून घेणे पण गरज पडल्यास बाहेरूनही घेता येते.
विसाव्या शतकात शास्त्रज्ञांनी एक चांगले प्रमेय मांडले ते म्हणजे प्रथिने जास्त काळ टिकू शकत नाही कारण त्यांना अमायनो अॅसिडची अत्यंत आवश्यकता असते.
म्हणजेच डॉ. रोज यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रथिने एकंदर आठ अमायनो ॲसिड आपल्याकरिता आवश्यक असतात. तसेच लहान मुलांना, प्रत्येक लहान मुलाना हिस्टीडीन हे घेतलेच पाहिजे नाही तर त्याचा विपरित परिणाम होतो. साधारणपणे प्रथिने मांसाहारी असतात. पण जर आपल्या फराळाला तसेच निरनिराळ्या प्रकारचे जेवण सुधारणे आवश्यक असते. तरच ते सर्व अमायनो ॲसिड घेणे प्राप्त आले. जर अमायनो ॲसिड आपल्या आहारात नसेल तर अशा व्यक्तीला नेहमी उदास होणे अथवा थकवा येणे वगैरे विपरित परिणाम होतो. अशा व्यक्तीला आपण कोणते अमायनो ॲसिड देऊ शकतो, हे अगत्याचे आहे. जर एखाद्या व्यक्तीला प्रथिने कमी पडल्यास पंडुरोग (अॅनेमिया) झाल्यास प्रथिने अमायनो ॲसिडपासून फायदा होतो.
आपल्या अन्नात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. ही प्रथिने वेगवेगळ्या प्रकारची असतात. त्याना अमायनो अॅसिड असे म्हणतात. जागतिक शास्त्रज्ञाने अशा प्रकारची अनेक अमायनो अॅसिड तयार केली. एका शास्त्रज्ञाने अशा प्रकारची २२ अमायनो ॲसिड तयार केली. परंतु त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की काही अमायनो ॲसिड आतूनच घ्यावयाची असते. तरच त्यांचा उपयोग होतो. अशा एकंदर दहा अमायनो ॲसिड तयार केली व त्यांना अत्यावश्यक अमायनो ॲसिड म्हणत असत व ते बाहेरूनच घेतली पाहिजेत. यात हरभरा अथवा चणे असे एकत्र अमायनो ॲसिड असते. ते परिपूर्ण असते. म्हणून सर्वाने हरभरा अथवा चणे खाणे क्रमप्राप्त असते. म्हणून लहान मुलांना चणे खाणे शिकवणे अत्यंत आवश्यक असते. आपल्याकडे दर शुक्रवारी मुलांना चणे खावयास देतात, ते याचमुळे असावेत.
-श्री. मदन देशपांडे
Leave a Reply