शोले चित्रपटात अमजद खान यांनी साकारलेला गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपैकी एक आहे. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी झाला.
‘शोले’ मधील गब्बरची भूमिका करून ‘अमजद खान’ यांच्या एंट्री ने सिनेप्रेक्षकांना अक्षरश: अचंबित करून सोडले. ‘शोले’ या सुपर डूपर हिट सिनेमातील निर्दयी, सहृदयतेचा लवलेशही नसणारा, कल्पनातित क्रूर , रांगडा डाकू त्याने पडद्यावर असा जिवंत केला कि तो पहिल्याच सिनेमानंतर खलनायकांच्या श्रेणीत अत्यंत वरच्या क्रमांकावर जाऊन बसला. प्राण जसा शम्मी कपूर च्या प्रत्येक सिनेमात खलनायक म्हणून दिसला, तसाच अमजद खान, अमिताभ चा ‘प्राण’ बनला.
‘शतरंज के खिलाडी’ या प्रेमचंद यांच्या लघुकथेवर सत्यजित राय यांनी त्याच नावाने एक चित्रपट बनवला. त्यातील कंपनी सरकारचे पत्र भिरकावून देत लखनवी अस्मिता आणि स्वतःच्या शायरीच्या बढाया मारणारा वाजिद अली (अमजद खान) आपल्याला अजूनही आठवतो.
अमजद खान यांच्या गब्बरने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक पार केले होते. ब्रिटानियाच्या ग्लुकोज बिस्किटांसाठी वापरण्यात आलेला तो व्यक्तिरेखेवर आधारलेला अमजद खान पहिला ब्रँड ठरला होता. आपल्या करिअर मध्ये त्यांनी ‘शोले’, ‘परवरिश’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘लावारिस’, ‘हीरालाल-पन्नालाल’, ‘सीतापुर की गीता’, ‘हिम्मतवाला’ आणि ‘कालिया’सारखे हिट सिनेमे दिले. जवळपास १३० सिनेमांत कारण करणा-या अमजद खान यांचे अनेक डायलॉग्स आजही आठवणीत आहेत. अमजद खान यांचे २७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply