डाॅ. विवेक उपासनी, जळगांव यानी लिहीलेला खालील लेख WhatsApp वर वाचण्यात आला. त्यातील सर्व मुद्दे मनाला पटले आणि मला मनापासून वाटते की माझ्या संपर्कात असलेल्या माझ्या सर्व बुद्धीजीवी मित्रांनी देखील हा लेख वाचून त्यांवर खरोखरच योग्य विचार करावा म्हणून….
काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून मोदींचे सरकार निवडून दिले.
त्याच्याही प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजिवी तुटून पडताहेत.
आपण खरं म्हणजे खुश राहण्याची आपली क्षमता गमावून बसलोय. आपली सहनशक्ती जवळपास संपत आलीय.
एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले – वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बर्याच नेत्यांनी कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवली नाही.
ही व्यक्ती किमान काही निर्णय घेवून काही जनताभिमुख सुधारणा आणण्याचा प्रयत्न तरी करतोय तर बुद्धीजिवी लोक विनाकारण भ्रष्टाचारी लोकांना अनावधानाने का असेना साथ देताना दिसताय. भ्रष्टाचारी लोकांना तर मोदी नकोच आहे.
पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे की, मोदी स्वतः पैसे खात नाही कुणाला खाऊ देत नाही.
त्या माणसाने १२ वर्षे गुजरातचे नेतृत्व केले.
विकासात पिछडलेला गुजरात सर्वात पुढे नेवून ठेवला. आज प्रत्यक्ष जावून बघा गुजरात मध्ये रस्ते आणि इतर प्राथमिक सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत किती चांगल्या आहेत.
आता पंतप्रधान असतानाही तो व्यक्ती १४-१६ तास काम करतो,
विदेश दौऱ्यात हॉटेलात न थांबता विमानात झोप घेतो,
त्याने अडिच वर्षात सुटी घेतलेली नाही,
त्याच्यावर कुठलाच व्यवहारात पैसे खाल्ल्याचा साधा आरोप नाही,
स्वतःच्या किंवा कुणा नातलगाच्या नावे मालमत्ता घेतल्याचे आढळलेले नाही,
कुठलाही नातेवाईक लाभाच्या पदावर नाही, मंत्रिमंडळात निवडून शक्य तेवढे जादा प्रामाणिक लोक नेमलेले आहेत.
सगळे नातेवाईक चरितार्थासाठी १०-१५ वर्षापूर्वी करीत होते तिच नोकरी व व्यवसाय करताहेत, त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय बदल दिसत नाही.
असं यापूर्वी भारतात घडल्याचं मला तरी माहीत नाही, तरी आपण अशा व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयावर तुटून पडत राहिलो तर आपण चांगला म्हणणार कुणाला? आपण खुश आणि समाधानी कशाने होणार ?
प्रत्यक्ष राम, कृष्ण किंवा शिवाजी जरी पंतप्रधान झाले तरी आपण टीकाच करणार का ? निर्णय घेताच चांगले-वाईट परिणाम दिसण्याआधीच टीका.
उलट मी तर म्हणतो जनतेसाठी काहितरी करण्याची तळमळ असलेल्या अशा माणसाचा एखादा निर्णय चुकला तरी त्याच्या पाठिशी ठाम रहायला हवे.
असे केले नाही तर भविष्यात कोणताही नेता जनकल्याणाच्या गोष्टीसुध्दा करणार नाही. सत्ता मिळाली की आपल्याच सात पिढ्यांचे कल्याण करुन मोकळा होईल. आजही ९९ टक्के लोक तेच करताहेत.
पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत.
धन्यवाद !
लेखक – डॉ. विवेक उपासनी, जळगाव.
Leave a Reply