नवीन लेखन...

वाचनालयाचा एक अप्रतिम अनुभव

An Experience at a Library in United States

अमेरिकेत बराच काळ वास्तव्यात होतो. मुलाकडे कांही महिने राहण्यासाठी गेलो होतो. दुरदर्शनावरिल बातम्यावरुन महाराष्ट्रामध्ये घडणारय़ा घटना कळत होत्या. Shiwaji Hindu King in Islamic India by James W. Laine ह्या पुस्तकाच्या लिखानावरुन सामान्य जनतेमध्ये संतापाची भवना निर्माण झाली होती. मी पण हे सारे वाचून बेचैन झालो होतो. एका परकिय लेखकाने शिवाजीमहाराजा संबंघी लिहीलेले वादग्रस्त लिखान काय असावे हे समजण्याची उत्सुकता वाटू लागली.

मी जवळच असलेल्या एका मोठ्या वाचनालयांत गेलो. प्रचंड ग्रंथसंख्या असलेले ते ग्रंथभांडार होते. अतिशय शिस्तीत निरनिराळ्या काचेच्या कपाटांत ठेवलेली पुस्तके दिसून आली. बसण्यासाठी उत्तमप्रकारचे फर्नीचर, टेबल-खुर्च्या शिस्तीत लावलेल्या. वेगवेगळी दालने, संपूर्ण भाग एअर कंडीशनने व्यापलेला. प्रत्येक ठिकाणी Computer ची आणि Xerox ची सोय. कागद व पेन्सचा मुबलक साठा, फोटोप्रिंटस घेण्याची सोय इत्यादी दिसून आले. सभासदाना I. Card दिलेले असून एका वेळी ३ ते ४ पुस्तके दिली जात. सभासद ती २१ दिवस घरी ठेऊ शकत होता.

कंपुटरच्या सहायाने पुस्तकांची वितरण व्यवस्था व परत मिळाल्याची नोंद अटोमँटीक होत असे. वाचनालयातर्फे देवू केलेली पुस्तके आणि वाचकांकडून परत आलेली पुस्तके फक्त वेगवेगळ्या फिरत्या Tract वर ठेऊन हे साध्य होत असे. ही सर्व पद्धती तो वाचक स्वतः करीत असत. (आगदी लहान ५-६ वर्षाची मुले देखील) लेझर दिव्याच्या झोताच्या सहायाने पुस्तकांची नोंदणी पद्धतशीर करताना, देवान-घेवान च्या नोंदी करीत. फक्त अद्यावत शास्त्रीय ज्ञान (Technical Knowledge) , आणि विश्वास ह्या दोन समजावर वाचनालयाचा व्यवहार सहज आणि सुरळीत चाललेला दिसून आला. सर्व हालचाली शांत व पद्धतशीर होत असल्याची जाणीव झाली. फक्त अडचणीच्याच वेळी तेथील मदतनिसांची मदत घेतली जाई.

मी ग्रंथपालाकडे मला हवे असलेल्या पुस्तकाची चौकशी केली. त्याने कंपुटरच्या सहायाने संपूर्ण यादी चाळली. मला ते पुस्तक मिळाले नाही. ते पुस्तक त्यांच्याकडे नव्हते. त्यानी मजकडून एक फॉर्म भरुन घेतला. त्यात माझे सभासद कार्ड नंबर, पुस्तकाचे नांव व त्याचा लेखक ह्याची नोंद केली. मला ते पुस्तक दोन आठवड्यानंतर मिळेल हे सांगण्यात आले. आणि आश्चर्य म्हणजे कांही दिवसांनी वाचनालयाने मला e-mail ने कळविले के ते पुस्तक त्यांच्याकडे उपलब्ध झाले आहे.

वाचकांच्या आवडी निवडीची इतकी कदर करणारी संस्था व यंत्रणा मी प्रथमच बघत होतो. माझे त्याना घन्यवाद.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..