नवीन लेखन...

आभामंडळाचे विज्ञान – एक ओळख (तेजोवलय, ऑरा)

An Introduction to the Science of Aura

p-21548-aura-2सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये आपण सगळ्यांनीच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ दुर्लक्षित केलेले आहे. रोजची धावपळीची दिनचर्या, अतीश्रम, अयोग्य आहार (फास्टफूड), स्पर्धात्मक युगातील टेंशन्स, रोज पूढे येणाऱ्या असंख्य अडचणी, अति जनसंपर्क, अॅलोपॅथी औषधांचा अतिवापर या सगळ्या गोष्टी शरीर मनावर अतिरिक्त ताण उत्पन्न करतात, असंतुलन वाढते. शरीरातील सकारात्मक उर्जा कमी होते. नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढतो, ऊर्जावाहिनी नाड्यांमध्ये या कारणाने अडथळे निर्माण होतात. याचा परिणाम म्हणून शरीरातील ऊर्जा संतुलन बिघडते, भौतिक शरीरावर परिणाम दिसू लागतो. शरीर रोगांनी दुषित होते. आपल्या अन्नमय कोषात आजार दिसू लागतात. यावर आपण उपचार घेऊ शकतो. पण प्राणमय आणि मनोमय कोषातील व्याधी दिसत नाहीत. सगळे रिपोर्टस नॉर्मल येतात. पण रोगाची लक्षणे मात्र नाहीशी होत नाहीत.

आरोग्याची व्याख्या वर्ल्ड हेल्थ ऑरगनायझेशन (WHO) या संस्थची अशी आहे की, रोगाचा किंवा अपंगत्वाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक पातळीवर पूर्ण स्वास्थ्याची भावना होय.

आपल्या भारत देशामध्येच हजारो वर्षांपूर्वी ऋषीमूनींनी तपश्चर्येद्वारे, ध्यान धरणा करून जाणून घेतलेले विश्वातील प्रत्यक्ष रहस्य, विश्वचैतन्य, कुंडलिनी शक्ती, आत्मा-परमात्मा शरीरांतर्गत 7 चक्र, त्यांचे शरीरातील अवयवांशी असणारा संबंध, याचा अभ्यास केला होता. मानवी शरीर हे तीन स्तरांमध्ये असते. शरीर, ऊर्जा व मन. शरीर म्हणजे स्थूल देह (व्हिजीबल फिझिकल बॉडी) ऊर्जा म्हणजे ऊर्जा शरीर (ऑरा) किंवा सूक्ष्म देह आणि तिसरे म्हणजे मन या तीनही गोष्टींचा योग्य समन्वय झाला तरचं आपल्याला निरोगी (शरीर) आयुष्य मिळू शकते. भौतिक म्हणजे स्थूल देहाला (दिसणऱ्या) ऊर्जा पुरवण्याचे काम सूक्ष्म देह अथवा ऊर्जा शरीर करत असते. सुक्ष्म देहाचा स्थूल देहावर सतत प्रभाव पडत असतो. ऑरा म्हणजे आभामंडळ म्हणजेच ऊर्जा देह एक तेजस्वी ऊर्जामय क्षेत्र आपल्या भोवती उत्पन्न करते. भौतिक शरीरात लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऊर्जेचा पुरवठा या ऊर्जामधून केला जातो. ही जैविक ऊर्जा सूर्यप्रकाश, हवा, वृक्षवल्ली, जमीन अशा वेगवेगळ्या नैसर्गिक स्त्रोतातून पुरवली जाते आपले शरीर निरोगी ठेवायला ही जैविक ऊर्जाच उपयुक्त ठरते.

पाश्चात्य देशातील संशोधकांनी केलेल्या शरीररचना शास्त्राप्रमाणे (Anatomy) आणि शरीरकार्य शास्त्राप्रमाणे (Physiology पाहिल्यावर सूक्ष्म शरीरातील चक्र ही शरीरांतर्गत असलेल्या महत्त्वाच्या ग्रंथीशी (Glands ) जोडलेली आहेत.

सर सी डब्लू लीडबीटर यांनी साधनेद्वारे उर्जा देहाचे रहस्य, 1927 साली प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये त्यांनी 1696 साली सर गिचटेलने स्वत: बघितलेल्या नाभी चक्राचा फोटो दिला आहे.

डॉ. किरली ऑन यांनी 1949च्या सुमारास किरलीअन फोटोग्राफी शोधून काढली. शरीराच्या चुंबकीय ऊर्जेमुळे शुध्द पांढऱ्या प्रकाशाचे पृथ:करण होऊन वेगवेगळ्या रंगांच्या छटा बघण्याची ही प्रणाली आहे.

सर हॅरि ओल्डफिल्ड यांनी 1989 मध्ये पॉलीकॉनट्रास्ट इन्टरफेरन्स फोटोग्राफीचा विकास केला. किर्लियन फोटोग्राफीने हे सिध्द केले आहे की कोणताही आजार शरीरात येण्यापूर्वर् तो आभामंडळावर रंगांच्या रुपात स्पष्ट दिसतो. म्हणूनच भौतिक शरीरावर इलाज करण्यासाठी प्रथम आभामंडळ (तेजोवलय) साफ केले जाते.

शरीराला होणारे आजार हे शरीराला पुरवल्या जाणाऱ्या ऊर्जेच्या असंतुलनामुळे झालेले असतात. आपण दुर्लक्षित केलेल्या आजारांचे रुपांतर पुढे मोठ्या व्याधीत (रोगात) होते.

बिघडलेले ऊर्जा संतुलन सुधारण्यासाठी पूर्ववत करण्यासाठी, सुक्ष्म शरीरातील ऊर्जेच्या प्रवाहाच्या अभ्यासावर उपचार प्रणाली व विविध औषधे जगभर विकसीत झालेली आहेत. शरीराची नैसर्गिक रोग प्रतिकारक शक्ती प्रबळ करण्याचं कार्य याद्वारे केले जाते.
गेली 50 वर्षे रशियामधे,आणि इग्लंडमधे गेली 15 वर्षे, आभामंडळावर (तेजोवलय) सतत संशोधन चालू आहे.

भारतामध्ये सुध्दा पुण्यातील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) कॉलेजशी संलग्न असलेली सेंटर फॉर बायोफिल्ड सायन्स (CBS) ही संस्था गेली 5 वर्ष याच क्षेत्रात काम करत आहे इथल्या अभ्यासकांच्या मते सध्याच्या प्रचलित रक्त चाचण्या, ए-क्सरेज, एमआर आय इ. चाचण्या करण्यापेक्षा आभामंडळ (ऑरा) चिकित्सा पध्दती भविष्यकाळात अधिक श्रेष्ठ ठरणार आहे. महिलांसाठी ही चिकित्सा पध्दती अधिक उपयुक्त आहे.

आभामंडळ (तेजोवलय ऑरा) याच्यावरच्या चिकित्सा पध्दतीमध्ये ऊर्जेचे अडथळे पाहिल्यावर खालील माहिती उपलब्ध होते.

1) आजार होण्याच्या आधी सूक्ष्म देहावर होणारे बदल (मानसिक, शारीरिक व भावनिक स्तरावर असणारे बदल)
2) आजार शरीराच्या (स्थूल) स्तरावर दिसू लागल्यावर…
3) आजारासाठी औषधे व इतर उपचार प्रणाली केल्यानंतर शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम.

p-21548-cure-for-sureआता हे सिध्द झाले आहे की, स्थूल देहात ऊर्जा पुरवण्याचे कार्यसूक्ष्म देह म्हणजे ऊर्जा करत असते. एका देहाचा प्रभाव सतत दुसऱ्या देहावर पडत असतो. मानवी शरीर निरोगी ठेवण्यास सूक्ष्म देह सतत ऊर्जा पुरवित असतो. जी ऊर्जा त्याला निसर्गातून मिळत असते, तसेच वापरलेली निरुपयोगी ऊर्जा शरीराबाहेर टाकली जाते.

आपली ही अदृश्य ऊर्जा पध्दती कमी खर्चात, कमी जागेत, कोणतीही साधन सामुग्री न वापरता, कोणतीही त्रासदायक ऊर्जा न सोडणारी, शरीराला स्पर्श न करता ऊर्जेचें अडथळे शोधून काढणारी, ऊर्जावलयावर आधारित आभामंडळ चिकित्सा पध्दत (नॅशनल हेल्थ स्कॅनिंग सिस्टीम)विकसित केली आहे.

ऊर्जा शरीराला ऊर्जा उपचारच अधिक योग्य ठरतो. कारण ह्या विश्वाची उत्पत्तीच ऊर्जेतुन झाली आहे.(बिग बँन्ग थिअरी ). ग्रह, तारे आणि सर्व जगच मुळात ऊर्जारुप आहे.

विषेश कॅमेऱ्यातून, ऊर्जेच्या प्रतिमेतून (काढलेल्या आभामंडळाचा फोटो-ऑरा फोटोग्राफी) सूक्ष्म शरीरातील चक्र, नाड्या यांना प्रत्यक्ष पाहून, त्यांची वैद्यकिय शास्त्राशी सांगड घालून भविष्यात असलेल्या व्याधी व त्यावर ऊर्जेच्या उपचारानंतर झालेला सकारात्मक बदल याचा अभ्यास चालू आहे.

त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्र शास्त्राचा वनस्पतींवर होणारा परिणाम विविध आयुर्वेदिक औषधांचा तसेच शिळे आणि ताजे अन्नपदार्थ खाल्यावर शरीरावर होणारा परिणाम दृश्य स्वरूपात ऑरा फोटोग्राफीत दिसतो.

संशोधन कार्यासाठी ठोस पुरावे गोळा करण्याचे कार्य चालू आहे. कमी खर्चाच्या उपचार प्रणालीला ऊर्जीतावस्था आणणे, उपचारापूर्वी व उपचारानंतरचा सकारात्मक बदल दाखवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

यापुढेही जाऊन ऊर्जाशास्त्र आणि आभामंडळाचा अभ्यास याचे संशोधन करून आभामंडळ चिकित्सा पध्दत विकसित करणे. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था पाहता, ऊर्जावलयावर आधारित आभामंडळ चिकित्सा पध्दत विकसित करणे. हे आत्तापासूनच करायचे कार्य आहे.

सेंटर फॉर बायोफिल्ड इव्हॅल्युएशन ( आभामंडळाचे संशोधन व विश्लेषण सेंटर ) ठाणे, ही संस्था काही नि:स्वार्थी, नि:धर्मी, सेवाभावी व्यक्तींच्या माध्यमातून विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन स्थापन केली आहे.

ऊर्जा शरिराला ऊर्जा उपचार अधिक योग्य ठरू शकतात. यावर विश्वास असणाऱ्या व्यक्तींनी या शास्त्राची माहिती, संघटीत/असंघटीत संस्था, संघटना, कंपन्या, कॉरपोरेट वर्ल्ड यांच्यापर्यंत पोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तेथे काम करणारे सभासद वा कमर्चारी (Key Person) ह्यांच्या शरीरिक, मानसिक व भावनिक संतुलनाचा विचार ह्यांचा ऑरा काढुन स्पष्ट करणे, आणि योग्य उपचार पध्दतीने त्यांचे आरोग्य व कार्यक्षमता वाढविणे. हे महत्त्वाचे कार्य सुरु केले आहे.

हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन संस्थेने या कामाला सुरुवात केलेली आहे. हे कार्य खूपच अवघड आहे, याची सर्वांनाच जाणीव आहे.

या मोठ्या कार्यासाठी त्यांचा विस्तार करण्यासाठी आपणा सर्वांचेच सहकार्य व आशिर्वाद अपेक्षित आहे. आजच्या तरून पिढीला विज्ञाननिष्ठ समज लवकर येते, त्याचा फयदा घेऊन भारतीय योगशास्त्राला अवगत असलेले हे गुढ विज्ञान आज पुन्हा विज्ञानाच्या सहा्याने प्रसतुत करणे हा या संस्थेचा हेतू आहे. नि:शुल्क व्याख्यान देताना ऑडियो, विडिओज स्लाइड शो यांचाही अंतर्भाव केला आहे.

या व्याख्यानामध्ये खालील मुद्दे स्पष्ट करण्यात येतात :-

(1)आभामंडळ (तजोवलय) म्हणजे काय? आणि संपुर्ण आरोग्य याबद्दल जागृकता.
(2) वैश्व चैतन्य (परमात्मा) वैश्वीक ऊर्जा, संकल्पना.
(3) कुंडलिनी शक्ती, नाड्या, चक्र, यांची संकल्पना.
(4) सूक्ष्म शरीर आणि त्यातल्या ऊर्जेच्या प्रवाहाची संकल्पना.
(5) सूक्ष्म ऊर्जेच्या वलयांचे (आभामंडळाचे ) छायाचित्रिकरण.
(6) निरोगी स्वास्थ्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार.

हे व्याख्यान सर्वांसाठी नि:शुल्क ठेवलेले आहे. कारण जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा ही इच्छा आहे.

संपर्कासाठी फोन नंबर :
डॉ. अनुप देव 9969679160 / 2532 2875
डॉ. जयकृष्ण शिंदे 98339 55595
प्रवीण शिंदे 98214 57772
हार्दिक शहा 90297 30657
सौ. स्नेहल कोरगावकर 98696 13712.

डॉ. अनुप देव
About डॉ. अनुप देव 2 Articles
डॉ. अनुप देव हे ठाणे येथील दंतचिकित्सक (Dentist) असून त्यांचा गेली तीस वर्षे कोपरी येथे दवाखाना आहे. त्यांचा आभामंडळ (Aura) या विषयावर गेली ७-८ वर्षे अभ्यास झाल्यामुळे दोन वर्षापूर्वी त्यांनी बायोपिल्ड इव्हॅल्युएशन या नावाचे सेंटर सुरु केले. या सेंटरमध्ये आतापर्यंत ५५० पेक्षा जास्त लोकांनी Aura काढून त्यांच्या शारिरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक समस्यांसाठी मार्गदर्शन घेतले आहे.

1 Comment on आभामंडळाचे विज्ञान – एक ओळख (तेजोवलय, ऑरा)

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..