नवीन लेखन...

एक ‘ ओरिजनल ठाणावाला ‘…..

जयंतीलाल त्रिभुवनदास ठाणावाला

एक ‘ ओरिजनल ठाणावला ‘…..

मला जेव्हा पासून कळू लागले तेव्हा पासून मी त्यांना पहात होतो. ठाण्याची तलावपाळी सर्वानाच माहीत आहे परंतु सध्या बोटींग क्लब समोरील चढण आहे त्यापासून पुढे दत्तमंदिर पर्यंतचा भाग लालबाग म्हणून ओळखला जातो, तेथील जयंतीलाल ठाणावला यांची प्रॉपर्टी होती, तेथील जयंतीलाल वाडी मध्ये त्यांच्या चाळी होत्या, त्यातील एका चाळीत सहा नंबरच्या खोलीत मी रहात होतो, मधोमध एक मोठा बंगला होता तो जयंतीलाल ठाणावाला यांचा होता, खानदानी श्रीमंती आणि दानशूरपणाचा अनुभव लहानपणापासून घेतला आहे त्यामुळे हल्लीचे भुक्कड पैसेवाले दानशूर पणाचा आव आणतात हे पाहून सॉलिड मजा आणि त्यांची कीव वाटते.

ब्रिटिश सरकारने त्यांना रावसाहेब रावबहादूर ही पदवी दिली होती परंतु त्यांनी ती पदवी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ब्रिटिशाना परत केली .

जयंतीलाल ठाणावला यांचा जन्म १४ मार्च १९१४ रोजी झाला. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले व्यक्तिमत्व होत्र ते तसेच त्यांच्या तोडवरचे तेजच सर्व काही सांगून जात होते. घरात गाई, म्हशी होत्या. आम्हा चाळी मधल्या भाडेकरूंना कधी ताक, दही याची कमतरता लाभली नाही. त्यांच्याकडील गणपती आणि त्याची आरती आम्ही लहानपणापासून बघत होतो, त्यांच्याकडे चांदीची बगी, घोडागाडी होती त्यातून मिरवणूक काढली जाई. ठाण्यातील टी जे हायस्कुल ही शाळा त्यांनी उभी केली. ते खऱ्या अर्थाने ते ठाण्याचे पहिले नगराध्यक्ष होते ह्याबद्दल कुठेच नोंद दुर्देवाने नाही तेव्हा तर यांनी एका महिन्यात सरकारी तिजोरीत पैसे नसल्यामुळे त्यांनी त्यावेळी असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार स्वतः दिला होता, परंतु कर्मचाऱ्यांचे हाल होऊन दिले नाहीत. तसं ते त्याआधी ठाणे ब्युरो म्युनसीपालटी चे प्रेसिडेंट होते आणि त्यानंतर ते ठाणे म्युनसीपालटीचे प्रेसिडेंट झाले . त्यांची मुले सुरेश, हरेंद्र ,उर्वशी, धर्मिष्ठा ही मुले पण त्याच स्वभावाची होती.

त्यांच्या घरात लग्न वगैरे कुठलाही समारंभ असला तर संपूर्ण वाडीभर रोषणाई केली जाई , त्यावेळी सगळे त्यांच्या घरी भोंजन करत असत. कुणालाही अडचण आली के ते उभे रहात असत.

त्याच्याकडची दिवाळी पण भन्नाट असे दणादण फटाके लावत, साग्रसंगीत पूजा होत असे.

त्यांच्याघरी जेव्हा जनरल करिअप्पा आले होते तेव्हा मी त्यांची माझ्या आयुष्यातील पहिली स्वाक्षरी घरातली होती ती जे टाडा चे मुंबई ब्लास्ट चे जज प्रमोद कोदे यांच्या वडिलांच्या म्हणजे कोदे काकांच्या सांगण्यावरून . कोदे काका हे दणादण इंग्रजी बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व त्यावेळी आमच्या वाडीत होते.

आमच्या लालबागेत एकच टेलिफोन होता यौ त्यांच्याकडे परंतु कधीही त्यांनी निरोप दिला नाही असे झाले नाही , तर पहिल्यांदा टीव्ही त्यांच्याकडे आला जेव्हा मुंबई दूरदर्शन सुरू झाले त्यावेळी त्याचा संपूर्ण हॉल टीव्ही बघण्यासाठी भरला होता तेथे सर्वप्रथम टीव्हीवर बिस्मिल्ला खान यांची सनई ऐकली तर वाहतो ही दुर्वांची जुडी हे बाळ कोल्हटकर यांकगे नाटक बघीतले. अशा खूप आठवणी आहेत.

जयंतीलाल शेट यांच्याकडे पूर्वी शेख अब्दुल्ला पण आले होते असे माझे आजोबा सांगत. पुढे त्यांची प्रॉपर्टी विकावी लागली, त्याजागी उंच इमारती बांधल्या गेल्या , त्याच इमारती मध्ये ते 8 व्या मजल्यावर रहात असत आणि आम्ही पाचव्या मजल्यावर.

यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई देखील आमच्या दीपक बिल्डिंग मध्ये आलेले मला आठवत आहेत.
आजही मला आठवते ते वैभव त्यांच्या पत्नी कांताबेन म्हणजे सुरेश , हरेंद्र यांची आई. त्यांच्यामध्येही विलक्षण तेज दिसत होते.

सुरेश ठाणावला हे उत्तम चित्रकार असून त्यांनी आमच्या लालबागेसंबंधी अनेक चित्रे रेखाटली असून ती त्यांच्या कजबुरच्या घरात आहेत, त्यातील एक चित्र मुद्दाम येथे देत आहे, ह्या चित्रांमुळे अनेक आठवणी जागृत झाल्या कारण ते चित्र आम्ही लहानपणापासून त्याचा जो बंगला पहात होतो त्याचे आहे.

जयंतीलाल शेट यांच्याकडे माणसांचा राबता असे, परंतु मध असेपर्यंतच भुंगे  येतात हे मी डोळ्याने पहात होतो .
तसेच संपत्तीचे असते त्यांनी खूप जणांचे भले केले होते.

तो शेवटचा दिवस उजाडला .. २७ डिसेंबर १९८३ रोजी वृद्धपकाळामुळे जयंतीलाल ठाणावला यांचे निधन झाले . तो दिवस कधीच विसरणार नाही.

त्या दिवशी त्यांची अंत्ययात्रा साधेपणाने निघाली. खूप माणसे नव्हती पण जी होती ती खरी होती.
माझ्या गॅलरी मधून तलावपाळी वरून त्यांच्या शाळेकडे निघाली.
त्यानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी ठाण्यातील फायर ब्रिगेडने त्यांना अंतिम मानवंदना दिली होती.

बस खरा सच्चा , ओरिजनल ‘ ठाणावला ‘ आमच्यातून गेला होता .

आजही त्याचा मुलगा सुरेश ठाणावला याने त्याच्या दिवंगत पत्नीच्या नावाने बहिऱ्या , मुक्या मुलांसाठी शाळा कौपनेश्वर मंदिराजवळ सुरू करून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून कसम करत आहे.

जयंतीलाल ठाणावला एक नाव नव्हते तर खऱ्या अर्थाने ते ठाण्याचे भूषण होते, खरे ‘ ठाणावला ‘ होते .

— सतीश चाफेकर
जयंतीलाल वाडी
लालबाग ठाणे.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..