व्हॉटसअॅप वरुन आलेली एक हृदयस्पर्शी कविता. जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे पोस्ट केली आहे.
केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??
कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
कधी एखाद्या निराधार बालकाचा
पालक होऊन बघ
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ
एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !!
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच
मस्तक सशक्त होत…..
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत….
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसत…!
शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?
शाळेत आज मुलांना बसायला
साधी फरशी नाही
मंदिराला मात्र संगमरवरी ?
शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही……
आपला भारत नक्की महासत्ता होणार ?
पायात घालायची चप्पल ए सी मधे विकायला ठेवतात आणि
भाजीपाला फूटपाथवर…..
म्हणे आमचा देश कृषी प्रधान
आणि आत्महत्या करतो शेतकरी…
शेकडो मैल चालतो वारकरी…
अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..! ….
– व्हॉटसअॅप वरुन
नमस्कार.
फारच सुंदर व effective कविता ! बावली. वाचून, थरारून आलं. माणसांच्या वागण्यातील दोन टोकांचा विरिधाभास फारच परिणामकाररीत्या मांडला आहे. कवीचें नांव माहीत नाहीं, कवीनें आपलें नांव कां बरें लिहिलें नाहीं? जागा कमी पडली, की कांहींजणांच्या संभाव्य टीकेचा विचार करून, नांव गुप्त ठेवलें ? पण त्याचें / तिचें हार्दिक अभिनंदन !
भारत हा सेक्युलर देश आहे. ( म्हणजे खरेंतर, सर्वधर्मसमभाव असलेला, असा त्याचा अर्थ. साधारणपणें लोक ‘निधर्मी’ असा घेतात. ). तर, या ‘निधर्मी’ राज्यात, मंत्री बाबांचे पाय धुतात. मंदिरात जाऊन देवाची पूजा करतात, शिर्डी, पंढरपूर, तिरुपती, साबरीमाला वगैरे बरीच अशी ठिकाणें सांगतां येतील. ( अणि तेंही, मंत्री म्हणून ; व्यक्तिगतरीत्या नव्हे. व्यक्ती म्हणून त्यांनी मंदिर, मशीद, जैन देरासर, बौद्ध विहार, गुरुद्वारा, चर्च , अग्यारी, सायनॉगॉग कुठेही जावे; पण मंत्री म्हणून, नेते म्हणून, तिथें सन्मान कशाला अपेक्षावा ? मंत्री म्हणून तेथे VVIP अशी वागणूक दिली जावी, ही इच्छा कशाला ? ). तर, तें कांहींही असो, त्यात शिरण्यापेक्षा, समाजभान असलेल्या व सच्चे समाजकार्य करणार्या लोकांना आपण सलाम करू या .
सुभाष स. नाईक