कधी खेळकर तर कधी चिंतातुर..
कधी आनंदी तर कधी उदासीन..
अनाकलनीय हुरहूर ही विलक्षण..
तरीही , उमलते हळुहळु जीवन..।।१।।
कालचक्र सृष्टीचे , अखंड अविरत..
तांडव , पंचमहाभूतांचे ऋतूऋतून..
स्पंदनांतुनी , सुखदुःखांचे ओघळ..
ऋणानुबंधी ! सारे संचिती जीवन..।।२।।
प्रीतभावनां ! अंकुर मानवतेचा..
प्रीतीविना कां दुजे असते जीवन..
ब्रह्मानंदी ! केवळ स्पर्श प्रीतीचा..
कृपावंती मोक्षदा , कृतार्थ जीवन..।।३।।
भाग्यवंतांच्याच , मनहृदयावरती..
अलवार प्रीतिचेच अविरत सिंचन..
ब्रम्हांडी! ही लाघवी साक्ष लोचनी..
हर्षोत्सवात ! रंगुनी जाते जीवन..।।४।।
© वि.ग.सातपुते.(भावकवी)
रचना:- क्र. ४०
दिनांक:- १५ – ३ – २०२१.
Leave a Reply