मी आजही अलवार
जीवापाड कुरवाळतो
काहुर अव्यक्त वेदनांचे
मनोमनी शांत सुखावतो..
जे लाभले भाग्य ललाटी
ते निमुटपणे मी भोगतो
घेवुनीया व्रत सत्कर्माचे
मी जगती विवेके जगतो..
जन्म गतजन्मांचेच कर्म
ओंजळीत घेवुनी जगतो
हिशेब साराच पापपुण्णी
चित्रगुप्त तो चोख ठेवतो..
कावडीच सुखदुःखांच्या
सोबती घेवुनी मी चालतो
सरतातही क्षण जीवनाचे
नकळे मज कोण सावरतो..
सारेसारेच अगम्य अतर्क्य
केवळ दयाघना आठवितो
तो एक अदृश्य अनामिक
सर्वत्र अणुरेणुतुनी दिसतो..
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८५
२/८/२०२२
Leave a Reply