सर्वांतरी, तो एक अनामिक
चराचर सारे रूप भगवंताचे
प्रेमवात्सल्ये जगतो जीवात्मा
आत्म्यात रूप त्या भगवंताचे
कळणार कधी, तुला मानवा
हा जन्मची रे दान दयाघनाचे
तोची वसतो जीवाजीवातुनी
जाण रे, सत्यरूप भगवंताचे
कोण म्हणूनी? कां रे संभ्रम
ब्रह्मांडाचे, रूपही दयाघनाचे
त्याच्या ठायी नतमस्तक व्हावे
रांजण, भरित रहावे सुकृताचे
वि.ग.सातपुते.( भावकवी)
(9766544908)
रचना क्र.२७१
२५/१०/२०२२
Leave a Reply