ध्येय असावे तुमचे नेहमीं
आनंद मिळवण्याकडे
‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो
समजून घ्याहो हे कोडे ।।१।।
शरीर देई ‘सुख ‘ तुम्हांला
क्षणिक ते तर असती
सुखाच्या पाठीशी छाया असते
‘दुःख ‘ तयाला संबोधती ।।२।।
सुखाबरोबर नाते असते
सदैव अशाच दुःखाचे
वेगळे त्यांना कुणी न करती
जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।।
‘आनंद ‘ भावना असे एकटी
नसे तेथे दुजी भावना
‘मोक्ष’ तयाला म्हणती कुणी
आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां ।।४।।
व्यर्थ जातील प्रयत्न तुमचे
‘आनंद’ शोधता बाहेरी
विसरुन जाता जर देहाला
मिळेल तुम्हां ते अंतरी ।।५।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply