आनंद भाटे हे एका माहिती तंत्रज्ञान कंपनीत अधिकारी पदावर काम करतात. आपली नोकरी सांभाळून ते गायन करतात. आनंद भाटे यांच्या घरात आधीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म २९ एप्रिल १९७१ रोजी झाला. त्यांचे पणजोबा भाटे बुवा हे ठुमरी गायनातील व नाट्यसंगीतातील एक प्रसिद्ध गायक होते. त्यांचीही नाटक कंपनी होती, आनंद भाटे यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी वयाच्या दहाव्या वर्षी बालगंधर्वांचे ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव चंद्रशेखर देशपांडे यांच्याकडे त्यांना संगीत शिक्षण घेण्यास पाठवले. यशवंत मराठे यांच्याकडे ही त्यांनी शास्त्रीय शिक्षणाचे धडे गिरवले. आनंद यांनी २७ ऑगस्ट १९८१ रोजी म्हणजेच वयाच्या दहाव्या वर्षी मुंबई दूरदर्शनवरून “परब्रह्म निष्काम” आणि “जोहारमायबाप” ही दोन गाणी म्हणाली होती व आपला पहिला गाण्याचा कार्यक्रम केला.
आनंद भाटे हे पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य. संगीत नाटकांतील नाटय़पदे आणि अभिनयामुळे मराठी रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण करणारे बालगंधर्व आणि शास्त्रीय संगीताबरोबरच संतवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांवर आपल्या आवाजाचे गारुड करणारे पं. भीमसेन जोशी या दोघांचीही गायनशैली पूर्णपणे वेगळी होती. आनंद भाटे हे दोघांना जोडणारा समान धागा आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्याच एका कार्यक्रमात कमलाकर नाडकर्णी यांनी आनंद यांना ‘आनंद गंधर्व’ ही पदवी दिली. आणि मग पुढे कार्यक्रमालाही तेच नाव देण्यात आले. अनेक वेळा सवाई गंधर्व महोत्सवात त्यांनी आपले गायन सादर केले आहे. पंडित भीमसेन जोशी आणि बालगंधर्व हे त्यांचे आदर्श आहेत. जुन्या मैफलींची क्षणचित्रे, त्यांच्याकडचे अंदाजे १०० वर्षे जुने असलेले उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचे तानपुरे आहेत. नवीन पिढीतल्या कोणत्या शिष्यांकडून अपेक्षा आहेत या प्रश्नाला पंडित भीमसेन जोशी यांनी “आनंद भाटे”, असे दूरदर्शनवरील एका मुलाखतीत सांगितले होते. बालगंधर्व यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात त्यांनी अनेक गाणी गायिली असून त्यातील अनेक गीतांना पुरस्कार मिळाले आहेत. आनंद भाटे यांना “बालगंधर्व” या मराठी चित्रपटातील ‘चिन्मया सकल हृदया’ या भैरवीसाठी २०११ चे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आनंद भाटे यांचे गायन
Leave a Reply