देहमनाचा आनंद औरची,
नसे तयाला दुजी कल्पना ।
जीवनामधले मिळता सारे,
न तेथे कसली तुलना ।।१।।
आनंदाचा घट भरूनी हा,
तन मन देयी पिण्यासाठी ।
आनंदाला नसे सीमा मग,
अनेक घट अन् अनेक पाठी ।।२।।
एक घटातूनी आनंद मिळता,
दुजे घट हे जाती विसरूनी ।
अनेक घटांतील आनंद हा,
लुटाल कसा तृप्त होवूनी ।।३।।
दुजामध्ये समरस होवूनी,
लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा ।
‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो,
आनंद घटाचा भव्य पसारा ।।४।।
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply