मायकेल अँजेलो हा आंतराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या चित्र आणि शिल्पाला फारच मागणी असे. एकदा एका श्रीमंत माणसाने त्याला आपल्या दिवाणखान्यात लावण्यासाठी चांगल्या चित्राची मागणी केली. त्यासाठी अँजेलोला वाट्टेल ती किंमत द्यायला तयार झाला. परंतु अँजेलोने त्याला नम्रपणे नकार दिला. कारण त्याला माहित होते की, दिवाणखान्यी शोभा वाढेल मात्र रोज तेच ते चित्र पाहून एकदिवस तो श्रीमंत माणूसही कंटाळेल. नव्याचे नऊ दिवस या न्यायाने त्या चित्राचे कौतुक होईल व नंतर कदाचित त्याकडे दुर्लक्षही होईल, म्हणून फार मोठी किंमत मिळत असूनही त्याने त्या श्रीमंत माणसाला चित्र देण्याचे नाकारले. त्यानंतर एकदा मायकेल अँजेलो हा असाच रस्त्यावरून भटकत असताना रस्त्यावर काही तरी विकत बसलेल्या एका मुलाने त्याला पाहिले. त्या मुलाला अँजेलोबद्दल चांगली माहिती होती. अँजेलोला पाहताच तो मुलगा एक कागद घेऊन त्याच्याकडे पळत आला व म्हणाला, ‘अंकल, मला या कागदावर छानसे चित्र काढून द्याल?’ त्या निरागस मुलाच्या मनातील भाव ओळखून अँजेलो तेथेच रस्ताच्या कडेला बसला व त्याने त्या कागदावर लगेच एक सुरेख चित्र काढून त्या मुलाला दिले. ते चित्र पाहून त्या मुलाला विलक्षण आनंद झाला. मात्र अँजेलोला द्यायला त्या मुलाजवळ काहीच नव्हते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अपराधीपणाची भावना दिसली. त्यावर अँजेलो त्याला म्हणाला, या चित्राबद्दल मला तुझ्याकडून काहीही नको आहे. हे चित्र पाहून तुला जो आनंद झाला त्यातच माझ्या चित्राची किंमत वसूल झाली आहे. असे म्हणून त्या मुलाची पाठ थोपटून तो तेथून निघून गेला.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply