ढगास…
ओंजळ केलीस रिकामी
वाटले मला खरे जरा
नदीस…
प्रथमच वाहिलीस तू
वाहिले मनझरे जरा
डोहास…
तुझ्यात थांबले पाणी
आठवे बालपण ते जरा
जीवास…
झाला कोणता चमत्कार
मासा उलटा पोहतो जरा
डोंगरास…
झालास तू हिरवागार
डोळे माझे गर्द जरा
निर्झरास…
खडकादळी ती ऐकुनी
कर्ण झाले हे तृप्त जरा
फुलास…
असुनी पाने जी हिरवी
तुझा जन्म पिवळा जरा
निसर्गास …
दिलेस इतुके भरुनी
कविता तुझी सखी जरा
–© विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
मो.9421442995
(मराठवाडा – बीड परिसरात गत आठ-दहा वर्षानंतरच्या पावसामुळे नद्या वाहू लागल्या आहेत. दुष्काळ हटविण्यासाठी निसर्गाने पुढाकार घेतला. ही रचना त्या रचनाकर्त्यास, निसर्गास अर्पण …. )
Leave a Reply