हलके हलके निशा जाऊनी,
उषेचे ते आगमन होई,
निद्रेमधल्या गर्भामध्यें,
रवि किरणांची चाहूल येई ।।१।।
त्या किरणांचे कर पसरती,
नयना वरल्या पाकळ्यावरी,
ऊब मिळता मग किरणांची,
नयन पुष्पें फुलती सत्वरी ।।२।।
जागविती ते घालवूनी धुंदी,
चैत्यन्यमय जीवन करी,
जादूचा हा स्पर्श असूनी,
न भासे किमया दुजापरी ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply