नवीन लेखन...

मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे

मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा जन्म १८९२ साली रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे येथे झाला.

आपल्या प्राणप्रिय मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याचे यज्ञकुंड धगधगते ठेवणारे हे अनंत कान्हेरे! इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. त्यांचे शालेय शिक्षण हे बरेचसे औरंगाबाद येथेच झाले, परंतु नंतर ते शिक्षणासाठी नाशिक येथे झाले.

त्यांची शरीरयष्टी काही धिप्पाड नव्हती, तर तशी किरकोळच होती, पण लहानपणापासूनच मनाने ते अतिशय खंबीर व निश्चयी होते. नाशिक येथे शिक्षण चालू असतानाच त्यांनी पिस्तुल चालविण्याचे व नेमबाजीचे शिक्षण घेतले. वंगभंग चळवळीमुळे महाराष्ट्रात जेव्हा असंतोष खदखदत होता, त्या वेळी नाशिकला असणाऱ्या कलेक्टर जॅक्सनने बाबाराव सावरकरांना अंदमानात पाठविले. देशभक्तांचे खटले चालविणाऱ्या खरे वकिलांची सनद रद्द केली. तांबे शास्त्रींच्या प्रवचनांवर बंदी घातली. त्यामुळे तेथील क्रांतिकारकांनी कलेक्टर जॅक्सनला मारण्याचे ठरविले व ती जबाबदारी अनंत कान्हेरे यांनी स्वीकारली. ते योग्य संधीची वाट पाहात त्याच्या मागावरच होते. नाशिक येथील एका नाटकगृहामध्ये किर्लोंस्कर मंडळीच्या शारदा या नाटकाचा प्रयोग होता. त्याला कलेक्टर जॅक्सन यांना आमंत्रण होते व जॅक्सन यांनी ते स्वीकारले होते. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचे ठरवले.

ठरल्याप्रमाणे जॅक्सन आले व त्यांच्या खास ठरविलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अनंत कान्हेरे तेथे जवळच होते. क्षणार्धामध्ये त्यांनी आपले पिस्तूल काढले व जॅक्सन यांच्यावर सात आठ गोळयांच्या वर्षाव केला जॅक्सन जागेवरच ठार झाले. तो दिवस होता, २१ डिसेंबर १९०९.

जॅक्सन यांना ठार मारल्यावर अनंत कान्हेरे यांनी स्वतलाच मारुन घेण्याचे ठरवेल होते. पण त्यापूर्वीच ते आजूबाजूच्या जॅक्सन यांच्या सहकाऱ्यांकडून पकडले गेले, त्यामूळे त्यांचा तो हेतू साध्य झाला नाही.पोलिसांनी त्यांना पकडले तेव्हा, माझे कर्तव्य मी केले आहे. मी निसटून जाऊ इच्छित नाही असे उद्गार त्यांनी काढले. अंनत कान्हेरे यांच्यावर खटला चालून त्यांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशी देण्यात आले. त्या वेळी भारत माता की जय व क्रांती चिरायू होवो, असे उद्गार काढून ते आनंदाने फाशी गेले.

अनंत लक्ष्मण कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे या तीन क्रांतीवीरांची शौर्यगाथा पडद्यावर ‘१९०९’ हा चित्रपट निर्माते अजय कांबळी यांनी २०१३ मध्ये प्रदर्शित केला होता. याचे लेखन आणि दिग्दर्शन अभय कांबळी यांचे असून दिलीप अल्लम हे सहनिर्माते आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..