अनंतात नाम तुझे
तुझ्या चरणी माथा,
कानडा विठ्ठल तू
उभ्या पंढरीचा राजा
धाव घेतो तू सत्वरी
भोळा भाव भक्तीचा,
नामदेवाची खातो खीर
काय वर्णावा तुझा सोहळा
जनीचे दळतो दळण
सावत्या माळ्याचा पिकवी मळा,
श्रीखंडया बनून पाणी
भरले एकनाथांच्या घरा
चंद्रभागेच्या तिरी जमला
साऱ्या वैष्णवांचा मळा,
तुझ्या नामात तल्लीन
होतो भक्तांचा हा मेळा
ज्ञानदेवांनी सुरु केली
वारीचा अनमोल हा ठेवा,
नतमस्तक तुझ्या चरणी
माझा नमस्कार पांडुरंगा सदा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply